AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री

भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली (balasaheb thorat kolhapur guardian minister) आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री
| Updated on: Jan 08, 2020 | 11:22 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच जिल्हानिहाय पालकमंत्रिपद जाहीर (balasaheb thorat kolhapur guardian minister) केली. या यादीत राष्ट्रवादीला 12, शिवसेनेला 13 आणि काँग्रेसला 11 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहेत. यात भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली (balasaheb thorat kolhapur guardian minister) आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना अहमदनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहेत. मात्र महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली (balasaheb thorat kolhapur guardian minister) आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. मुंबई शहराच्या पालकमंत्रिपदी काँग्रेस नेते आणि वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांची वर्णी लागली आहे. तर मुंबई उपनगराच्या पालकमंत्रिपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीचेही पालकमंत्री पद मिळाले (balasaheb thorat kolhapur guardian minister) आहे.

राष्ट्रवादी (12)

1. पुणे- अजित अनंतराव पवार 2. रायगड – आदिती सुनिल तटकरे 3. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ 4. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ 5. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील 6. सांगली- जयंत राजाराम पाटील 7. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील 8. जालना- राजेश अंकुशराव टोपे 9. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक 10. बीड- धनंजय पंडितराव मुंडे 11. बुलडाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे 12. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

शिवसेना (13)

1. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे 2. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे 3. रत्नागिरी-  अनिल दत्तात्रय परब 4. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत 5. पालघर- दादाजी दगडू भुसे 6. धुळे- अब्दुल नबी सत्तार 7. जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील 8. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई 9. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई 10. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड 11. गडचिरोली-  एकनाथ संभाजी शिंदे 12. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख 13. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

काँग्रेस (11)

1. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख 2. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी 3. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 4. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड 5. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण 6. लातूर- अमित विलासराव देशमुख 7. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे) 8. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत 9. वर्धा – सुनील छत्रपाल केदार 10. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील 11. चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार

संबंधित बातम्या : 

शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याकडे दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

ठाकरे सरकारचे पालकमंत्री जाहीर, कोणत्या पक्षाला किती पालकमंत्रिपदं?

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, आदित्य ठाकरेंकडे ‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

महापालिकेवर शिवसेनेची सत्ता, तर मुंबईचे पालकमंत्रिपद काँग्रेसकडे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.