AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujrat Assembly Election | अरविंद केजरीवालांनी लिहून दिलं होतं… भविष्यवाणी खोटी ठरणार? सुरुवातीचे कौल तर….

अरविंद केजरीवाल म्हणाले होते- गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार बनणार आहे.

Gujrat Assembly Election |   अरविंद केजरीवालांनी लिहून दिलं होतं... भविष्यवाणी खोटी ठरणार? सुरुवातीचे कौल तर....
Image Credit source: social media
| Updated on: Dec 08, 2022 | 9:36 AM
Share

अहमदाबादः आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) म्हणाले होते… लिहून घ्या.. गुजरातमध्ये (Gujrat) आपचेच सरकार येणार. मुख्यमंत्री बनेल तर आमचाच… पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं होम ग्राउंड असलेल्या गुजरातेत हा दावा केजरीवाल यांनी केला. पण तो खोटा ठरण्याची चिन्ह आहेत.

गुजरात विधानसभा निकालांचे कौल हाती आले आहेत. एक्झिट पोल्सनी दर्शवलेल्या अंदाजांनुसार, भाजपचीच सरशी दिसून येत आहे.

182 विधानसभा सदस्यांच्या गुजरात राज्यात भाजपा आघाडीवर आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये 131 जागांवर भाजपा पुढे आहे. तर काँग्रेस पक्ष 42 जागांवर आघाडीवर आहे. आप फक्त 5 जागांवर पुढे आहे.

केजरीवाल म्हणाले होते– गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार बनणार आहे. २७ वर्षांच्या कुशासनानंतर गुजरातच्या जनतेला भाजपासून मुक्तता मिळणार आहे…

एक्झिट पोल्सच्या अंदाजांनुसार, गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येईल, असे म्हटले जात आहे. असे झाल्यास सातव्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसेल.

मात्र यंदा विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच आपची एंट्री झाल्याने भाजपा आणि काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या मतांवर काही प्रमाणात परिणाम होतील, असे अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवले जात आहे.

2022 च्या निवडणुकांमध्ये आपचे आकडे भाजपासमोर फिके असतील मात्र गुजरातमध्ये नुकतीच एंट्री केलेला हा पक्षा आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची मोठी डोकेदुखी ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

हिमाचल विधानसभेचं काय?

68 विधानसभा सदस्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सत्ता भाजप उलथून टाकते की काय, अशी चिन्ह आहेत. सुरुवातीला हाती आलेल्या कौलांनुसार,68 पैकी 36 जागांवर भाजप पुढे आहे. काँग्रेस 31 जागांवर पुढे आहे. तर आपने अद्याप खाते उघडल्याचे दिसून येत नाहीये.

हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.