Happy Birthday Devendra Fadnavis | भारतातील युवा महापौर ते मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचा रंजक प्रवास

देवेंद्र फडणवीस यांनी हाफ सेन्चुरी अर्थात वयाची पन्नाशी गाठली आहे. जन्मदिनी त्यांच्या कारकीर्दीवर नजर टाकणे रंजक ठरणार आहे.

Happy Birthday Devendra Fadnavis | भारतातील युवा महापौर ते मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचा रंजक प्रवास

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज (22 जुलै) वाढदिवस. भाजपच्या या युवा नेत्याने मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर अल्पावधीत लोकप्रियता तर मिळवलीच, मात्र दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची मर्जीही संपादन केली. देवेंद्र फडणवीस यांनी हाफ सेन्चुरी अर्थात वयाची पन्नाशी गाठली आहे. जन्मदिनी त्यांच्या कारकीर्दीवर नजर टाकणे रंजक ठरणार आहे. (Happy Birthday Devendra Fadnavis Read Interesting Facts about the Opposition Leader of Maharashtra)

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षातर्फे पहिलेच मुख्यमंत्री. शरद पवार यांच्यानंतर वयाच्या 44 व्या वर्षी ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वसंतराव नाईक यांच्यानंतर ते दुसरे मुख्यमंत्री ठरले.

“मी पुन्हा येईन” हा देवेंद्र फडणवीस यांचा नारा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भरघोस मताधिक्याने बाजी मारली. भाजपने बहुमत मिळवल्याने फडणवीस यांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी निवड जवळपास निश्चित मानली जात होती, मात्र फासे पालटले आणि भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेला.

महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक डिसेंबर 2019 रोजी निवड झाली. पाच वर्ष फडणवीसांना मुख्यमंत्रिपदी पाहिल्यानंतर त्यांना विरोधीपक्ष नेत्याच्या खुर्चीत पाहणे समर्थकांना काहीसे जड गेले. मात्र या अभ्यासू नेत्याने सहा महिन्यात ही भूमिकाही चांगल्या पद्धतीने वठवल्याचे दिसत आहे. यामुळेच दिल्लीश्वरही त्यांच्यावर खुश असल्याचे मानले जाते. देवेंद्र यांना केंद्रात स्थान मिळण्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून जोरावर आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (1992 आणि 1997) निवडून आले. नागपूरचे महापौरपद त्यांनी भूषवलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळवणारे ते पहिलेच.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य आणि कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपीठांनी गौरवलेले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा विवाह अमृता फडणवीस यांच्याशी झाला. अमृता फडणवीस यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात चांगले नाव कमावले आहे. त्यांना दिविजा ही कन्या आहे.

लोकप्रतिनिधित्व

 • 2019 पासून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते
 • 2014 ते 2019 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
 • 1999 पासून आतापर्यंत सलग पाच वेळा महाराष्ट्र विधानसभा सदस्य
 • 1992 ते 2001 सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव

राजकीय टप्पे

 • 2013 – अध्यक्ष, भाजप महाराष्ट्र प्रदेश
 • 2010 – सरचिटणीस, भाजप महाराष्ट्र प्रदेश
 • 2001 – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
 • 1994 – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
 • 1992 – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
 • 1990 – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
 • 1989 – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो

विधिमंडळातील कार्य

अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास आणि गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती

(Happy Birthday Devendra Fadnavis Read Interesting Facts about the Opposition Leader of Maharashtra)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI