AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी घरी असते तरी मेलेच असते ना…, शेतकरी आंदोलनावर हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

शेतकरी घरी असते तरी मेलेच असते ना.., असं वादग्रस्त वक्तव्य हरियाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल यांनी केलं आहे. J P Dalal Contravercial Statement

शेतकरी घरी असते तरी मेलेच असते ना..., शेतकरी आंदोलनावर हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य
जे पी दलाल हरियाणाचे कृषीमंत्री
| Updated on: Feb 16, 2021 | 7:33 AM
Share

नवी दिल्ली :  दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आतापर्यंत झालेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू हा त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे, असं हीन दर्जाचं वक्तव्य करत शेतकरी त्यांच्या घरी असते तरी ते मेलेच असते ना, असं अपमानजनक वक्तव्य हरयाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल यांनी केलं आहे. (Hariyana Agriculture Minister J P Dalal Contravercial Statement on Delhi Farmer Protest)

राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर गेली अडीज महिने शेतकरी ऊन वारा पाऊस झेलतो आहे. सरकारविरोधात संघर्ष करतो आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी शेतकरी लढतो आहे. हाच सगळा संघर्ष सुरु असताना काही शेतकरी धारातिर्थी पडले. यांचा अपमान करत शेतकरी आंदोलनाची खिल्ली हरयाणाचे कृषिमंत्र्यांनी उडवली आहे.

कृषीमंत्री जे.पी. दलाल यांचं नेमकं वक्तव्य काय

शेतकरी आंदोलनात बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, अशा बातम्या सातत्याने येत आहेत. पण मला वाटतं संबंधित शेतकरी त्यांच्या घरी असते तरी त्यांचा मृत्यू झालाच असता. त्यांचा मृत्यू त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे, असं ते म्हणाले.

दलाल यांच्यावर टीकेची झोड, नंतर माफीनामा

दलाल यांनी शेतकरी आंदोलनावर अपमानजनक टिप्पणी केल्यानंतर देशभरातील शेतकरी नेत्यांनी तसंच चळवळीतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. सर्वत्र निषेधाचा सूर निघाल्याने माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत दलाल यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली.

आतापर्यंत 200 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी देशभरातले शेतकरी नवी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. गेली अडीज महिने शेतकरी कशाचीही पर्वा न करता आपल्या मागण्यांसाठी लढत आहे. या लढाईत 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागलेत.

शेतकरी आंदोलनाचा वाढता प्रभाव

आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचं नाही, असा निर्धार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केलाय. याच पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात शेतकरी आंदोलन टिकण्यासाठी एसी आणि कुलरची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी सरकारने आम्हाला विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे.

(Hariyana Agriculture Minister J P Dalal Contravercial Statement on Delhi Farmer Protest)

हे ही वाचा :

बेडरपणे ‘सामना’ करणारे लोक, महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारचा बुरखा फाडला; सामनातून मोदींवर टीकेचे बाण

मोदीजी देशभक्त आणि राष्ट्रद्रोहींमधला फरक ओळखा, प्रियांका गांधी कडाडल्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.