नंदुरबारमध्ये उच्चशिक्षित उमेदवार, एकही गुन्हा नाही, संपत्ती मात्र दुप्पट

नंदुरबार : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. कुठे प्रचाराचा धुरळा उडतोय, तर कुठे उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु आहे. नंदुरबारमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजे 29 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या लोकसभा मतदारंसघातील भाजपच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसचे के. सी. पडवी या दोन मुख्य उमेदवारांनी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रही सादर […]

नंदुरबारमध्ये उच्चशिक्षित उमेदवार, एकही गुन्हा नाही, संपत्ती मात्र दुप्पट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नंदुरबार : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. कुठे प्रचाराचा धुरळा उडतोय, तर कुठे उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु आहे. नंदुरबारमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजे 29 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या लोकसभा मतदारंसघातील भाजपच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसचे के. सी. पडवी या दोन मुख्य उमेदवारांनी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आले. त्यातून दोन्ही उमेदवारांची संपत्ती समोर आली.

भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित

भाजपकडून डॉ. हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्याकडे एक कोटी 23 लाख रुपयांची एकूण मालमत्ता असल्याचे त्यांनी आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात सांगितले आहे. खासदार डॉ. हिना गावित यांच्या नावावर कोणतेही वाहन नाही आणि त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

डॉ. हिना गावित यांची 2014 मधील संपत्ती

  • एकूण संपत्ती – 58 लाख 24 हजार रुपये
  • स्थावर मालमत्ता- 21 लाख
  • जंगम – 38 लाख 94 हजार
  • कर्ज – 8 लाख 79 लाख 651

डॉ. हिना गावित यांची 2019 मधील संपत्ती

  • एकूण संपत्ती – 1 कोटी 23 लाख रुपये
  • जंगम मालमत्ता – 94 लाख 44 हजार 640 रुपये
  • स्थावर मालमत्ता – 29 लाख 8 हजार 211
  • कर्ज – 1 लाख 78 हजार रुपये
  • दागिने – 64 हजार 515
  • गुन्हे दाखल नाहीत
  • कोणतेही वाहन नाही

काँग्रेस उमेदवार के. सी. पडवी यांची संपत्ती

काँग्रेस उमेदवार के. सी. पाडवी यांच्या मालमत्तेत 2014 च्या तुलनेत तिप्पट वाढ झाली आहे. 2014 मध्ये के. सी. पाडवी यांच्याकडे एक कोटी 45 लाखांची मालमत्ता होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी दाखल करताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता 4 कोटी 19 लाख इतकी आहे. त्यांच्यावर 21 लाखांचे कर्ज आहे. पाडवी यांच्याकडे तीन वाहने आहेत, तर पत्नीच्या नावावर एक पेट्रोलपंप आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही

के. सी. पडवी यांची 2014 मधील संपत्ती

  • एकूण मालमत्ता – 1 कोटी 45 लाख रुपये
  • जंगम मालमत्ता – 27 लाख 84 हजार 356
  • स्थावर मालमत्ता – 1 कोटी 17 लाख 45 हजार 318

के. सी. पडवी यांची 2019 मधील संपत्ती

  • एकूण मालमत्ता – 4 कोटी 19 लाख
  • जंगम मालमत्ता – 38 लाख 4 हजार 350
  • स्थावर मालमत्ता – 3 कोटी 81 लाख 70 हजार 288
  • कर्ज – 21 लाख 39 हजार 840
  • वाहने – तीन टोयोटा क्वालिस, महिंद्रा बोलेरो, फॉरच्युनर
  • दागिने – दोन किलो चांदी (किंमत – ८५ हजार रुपये), 14 ग्रॅम सोने
  • एक ही गुन्हा दाखल नाही

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील दोघे उमेदवार उच्चशिक्षित असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. मात्र दोघांच्या मालमत्तेत दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे.

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.