बाळासाहेब असते तर उद्धव मुख्यमंत्री झाले नसते : नारायण राणे

बाळासाहेब असते तर उद्धव मुख्यमंत्री झाले नसते : नारायण राणे

जर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते." अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी (narayan rane criticizes uddhav thackeray) केली.

Namrata Patil

|

Dec 20, 2019 | 4:33 PM

नागपूर : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही आघाडी मुख्यमंत्रिपदासाठी केली आहे. जर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते.” अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी (narayan rane criticizes uddhav thackeray) केली. तसेच “बाळासाहेब नेहमी म्हणायचे त्यांना मुख्यमंत्रिपदामध्ये रस नाही.  माझ्यासाठी हिंदुत्व महत्वाचे. मात्र उद्धव ठाकरेंचे यात वैयक्तिक स्वार्थ आहे.” असेही राणे यावेळी (narayan rane criticizes uddhav thackeray) म्हणाले.

“राज्यपालांचे भाषण वाचल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचलं. राज्यपालांच्या भाषणावर बोलताना असे भाषण महाराष्ट्राच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी केलेले नाही,” असेही राणे यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रथा परंपरा पाळल्या नाहीत. दहा रुपयांत थाळी, सातबारा कोरा करु मात्र कॅबिनेटसमोर एकही प्रस्ताव आलेला नाही. 55 हजार कोटी फक्त सातबारा कोरा करायला लागतील.” असेही ते (narayan rane criticizes uddhav thackeray) म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी उद्गारवाचकमध्ये बोलायचं नसतं. पूर्णविराममध्ये बोलायचं असतं. राज्यातील आर्थिक स्थिती चांगली नाही असं ते बोलले, लाज वाटली नाही. आधी सत्तेत कोण होतं? इतर पक्ष बोलले असते तर गोष्ट वेगळी असती,” असेही राणे म्हणाले.

“राज्यपालांना जो मान सन्मान दिला पाहिजे ती शैली येथे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी भाषा खालच्या दर्जाची अगदी हलक्या थरातील भाषा वापरली राज्यपालांच्या भाषणावर कोणताही मुद्दा नव्हता,” असेही राणे (narayan rane criticizes uddhav thackeray) म्हणाले.

“अधिवेशनादरम्यान नागपूरचं वातावरण दिवाळीसारखं असतं. पण यावेळी असं काहीही वाटलं नाही. मी भाजपच्या कार्यालयात गेलो, सर्वांना भेटलो. लोकांची मतं जाणून घेतली. शिवसेना-भाजपच सरकार होतं. निवडणुकानंतर मात्र भाजप सत्तेत नाही. निवडणूकीपूर्वी दोघांची युती झाली. पण सरकार आल्यानंतर कोणते कोणते निर्णय घ्यावे राज्यात प्रकल्प आणावे यावर चर्चा झाली. युती 161 जागा जिंकल्या असल्या, तरी युती सत्तेवर आलेली नाही.” असेही राणे यावेळी म्हणाले.

“आपलं मंत्रिमंडळ एक महिना होऊनही पूर्ण झालं नाही. प्रश्नोत्तर होत नाही. कामकाज होत नाही. राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री हवा असे मला वाटते. राज्याच्या विकासाचे प्रश्न ज्याला माहिती आहे. ज्याला ज्ञात आहे. ज्याच्या प्रश्न सोडवायची धमक आहे. असा मुख्यमंत्री राज्याला मिळाला तर महाराष्ट्र चालेल. अन्यथा महाराष्ट्र अधोगती कडे गेल्यास त्याला जबाबदार सत्ताधारी असतील.” अशीही टीका नारायण राणेंनी (narayan rane criticizes uddhav thackeray) केली.

“राष्ट्रवादी टॅक्स फ्री आहे ते कुठेही जाऊ शकतात. मात्र शिवसेनेची आयडोलॉजी आजही हिंदुत्ववादी आहे का? हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावे.” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें