Sadabhau Khot:’फडणवीसांनी सांगितले तर सदाभाऊ साडी घालून…’ , केतकी चितळे प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बोचरी टीका

केतकीच्या वडिलांना नसेल इतका त्या पोस्टच्या अभिमान सदाभाऊ खोत यांना असेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे.

Sadabhau Khot:'फडणवीसांनी सांगितले तर सदाभाऊ साडी घालून...' , केतकी चितळे प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बोचरी टीका
NCP criticize Sadabhau Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 5:59 PM

मुंबई – अभिनेती केतकी चितळे (Ketaki Chitale)हिच्या पोस्टवरुन राज्यातील वातावरण तापलेले असतानाच, तिची बाजू घेणाऱ्या सदाभाऊ खोतांवर (Sadabhau Khot)राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP criticize)नेत्यांनी टीकेची राळ उठवली आहे. केतकीच्या वडिलांना नसेल इतका त्या पोस्टच्या अभिमान सदाभाऊ खोत यांना असेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे. आमराकीसाठी हपापलेले सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले तर  साडी घालून सिग्नलवर नाचतीलही अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत काय म्हणाले

सुरुवातीला सदाभाऊंनी केतकी चितळेनी केलेल्या पोस्टचा अभिमान असल्याचे म्हटले होते, त्यानंतर या प्रकरणात सारवासारव करत पोस्ट व्हायरल केली त्याचं समर्थन करत नाही. मात्र तिने खंबीरपणे कोर्टात स्वताची बाजू स्वता मांडली, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतरही तिच्यावर जो हल्ला झाला तो अशोभनीय आहे. अशी भूमिका घएतली होती. ती पोलिसांच्या ताब्यात असताना गुन्हेगारावर हल्ला होत असेल तर कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास संपेल. असे मत त्यांनी मांडले आहे.

राष्ट्रवादीच्या प्रतिक्रियांवर कारवाई का नाही सदाभाऊंचा सवाल

राष्ट्पवादीवर टीका करणाऱअयांना फोडा आणि तोडा असे पत्रक काढते, अमोल मिटकरी ब्राह्मण समाजावर खालच्या भाषेत टीका करतात, मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत, गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला होता, दगड टाकावासा वाटतो, त्याचा निषेध का होत नाही, त्यांचा सत्कार होतो, तो अन्याय वाटत नाही.का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीसांवर, चंद्रकांत पाटलांवर एकरी भाषेत टीका झाली, तेव्हा यांनी नियम घालून घेतले नाहीत, सत्तेत आहेत त्यांना लायसन परमिट आहे का, असा प्रश्न सदाभआऊंनी विचारला आहे. छत्रपती संभाजीराजेंना खासदारकी दिली तेव्हा आता पेशवे छत्रपतींना पगड्या घातल आहेत, या केलेल्या वक्तव्यांची आठवणही त्यांनी करुन दिली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जोरदार प्रत्युत्तर

भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी या पोस्टचा निषेध केलेला असताना सदाभाऊ खोत यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रावदीच्या नेत्यांनी सदाभाऊंवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार हे पक्षासाठी आणि राज्यासाठी एवढए काम करत असताना, अशी टीका अयोग्यच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. भाजपा यानिमित्ताने जातीचे राजकारण करीत आहे, हे विकृतीचे राजकारण असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे.

सदाभाऊ आमदारीकीसाठी हपापलेले -राष्ट्रवादी

सदाभाऊंना आमदारकी हवी आहे, त्यामुळे ते या प्रकरणात भूमिका घेत असल्याची टीका राष्ट्रवादीकडून करण्यात येते आहे. जर उद्या फडणवीसांनी सांगितले तर ते साडी घालून सिग्नलवर नाचतीलही, असे ट्विट काढून सूरज चव्हाण यांनी या प्रकरणात संताप व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.