नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध श्रीहरी अणे?

नागपूर: नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण नागपुरात नितीन गडकरींविरोधात विदर्भवादी नेते श्रीहरी अणेंनी लोकसभा लढवावी, अशी मागणी 12 विदर्भवादी पक्ष आणि संघटनांचा समावेश असलेल्या विदर्भ निर्माण महासंघानं केली आहे. सर्व विदर्भवादी पक्ष एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे नागपुरात विदर्भवाद्यांचे उमेदवार म्हणून […]

नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध श्रीहरी अणे?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नागपूर: नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण नागपुरात नितीन गडकरींविरोधात विदर्भवादी नेते श्रीहरी अणेंनी लोकसभा लढवावी, अशी मागणी 12 विदर्भवादी पक्ष आणि संघटनांचा समावेश असलेल्या विदर्भ निर्माण महासंघानं केली आहे. सर्व विदर्भवादी पक्ष एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे नागपुरात विदर्भवाद्यांचे उमेदवार म्हणून श्रीहरी अणे यांच्या नावाची जोरात चर्चा सुरु आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. केंद्रातील दिग्गज मंत्री आणि संघाचं मुख्यालय असल्याने, भाजपसाठी नागपूर लोकसभा मतदारसंघाचं मोठं महत्त्व आहे. गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भाच्या नावावर मतं मागितली, पण विदर्भ वेगळा झाला नाही. आता गडकरींविरोधात विदर्भवादी एकत्र एकवटले आहेत. नागपुरातून नितीन गडकरी विरोधात विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी निवडणूक लढावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी स्थापन केलेल्या विदर्भ निर्माण महासंघाच्या नेत्यांनी केली आहे.

स्वतंत्र विदर्भासाठी काम करणारे आठ पक्ष आणि चार संघटना एकत्र आल्या आहेत. या सर्वांनी मिळून ‘विदर्भ निर्माण महासंघा’ची स्थापना केली आहे. या महासंघात श्रीहरी अणे यांच्या विदर्भ राज्य आघाडी या पक्षाचाही समावेश आहे.

विदर्भ निर्माण महासंघातील पक्ष आणि संघटना

पक्ष                             संस्थापक अध्यक्ष

विदर्भ राज्य आघाडी- श्रीहरी अणे

विदर्भ माझा – राजकुमार तिरपुडे

प्रहार जनशक्ती पक्ष – आमदार बच्चू कडू

राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष– राजेश काकडे

आम आदमी पक्ष – देवेंद्र वानखेडे (विदर्भ प्रमुख)

बीआरएसपी – अॅड सुरेश माने

रिपब्लिकन पार्टी (खोरीप) – उपेंद्र शेंडे

प्रोऊटीस्ट ब्लॉक इंडिया – संतोष आनंद

विदर्भ राज्य आंदोलन समिती – वामनराव चटप

नाग विदर्भ आंदोलन समिती- अहमद कादर

जामुंतराव धोटे विचार मंच – सुनील चोखारे (अध्यक्ष)

नॅशनल फेडरेशन फॉर न्यू स्टेट्स- स्वप्नजीत सन्याल (राष्ट्रीय प्रवक्ते)

अशा बारा विदर्भवादी संघटना आणि पक्ष आता भाजप -काँग्रेसच्या विरोधात एकत्र आले आहेत.

विदर्भवाद्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपुरातून लढण्यासाठी कंबर कसली आहे. पण त्याचा नितीन गडकरींवर कुठलाही परिणाम होणार नाही. श्रीहरी अणे नागपुरातून लढल्यास त्यांची जमानत जप्त होईल, असा विश्वास भाजप प्रवक्ते आ. गिरीष व्यास यांनी व्यक्त केला.

12 विदर्भवादी संघटना पहिल्यांदाच निवडणुकीसाठी एकत्र आल्या आहेत आणि विदर्भातील सर्व म्हणजेच 10 लोकसभा आणि 62 विधानसभेच्या जागा लढवण्याचा निर्धार या संघटनांनी केला आहे. याचा काय परिणाम होईल, हे येणारा काळच ठरवेल.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.