AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम बंगालचा पहिलाच कल भाजपच्या बाजूने, ममता दीदींची धाकधूक वाढली

कोलकाता : मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सर्वात अगोदर पोस्टल मतांची मोजणी केली जाते. यावर्षी मोठ्या प्रमाणात पोस्टल मतं आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीचेच कल भाजपच्या बाजूने आले आहेत. इथे यावेळी मतदानाच्या काळात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालाय. भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये बंगालमध्ये लढत आहे. सुरुवातीचेच कल भाजपच्या बाजूने आल्यामुळे बंगालमधील रंगत वाढली आहे. भाजपने इथे किमान […]

पश्चिम बंगालचा पहिलाच कल भाजपच्या बाजूने, ममता दीदींची धाकधूक वाढली
| Edited By: | Updated on: May 23, 2019 | 8:19 AM
Share

कोलकाता : मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सर्वात अगोदर पोस्टल मतांची मोजणी केली जाते. यावर्षी मोठ्या प्रमाणात पोस्टल मतं आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीचेच कल भाजपच्या बाजूने आले आहेत. इथे यावेळी मतदानाच्या काळात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालाय. भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये बंगालमध्ये लढत आहे. सुरुवातीचेच कल भाजपच्या बाजूने आल्यामुळे बंगालमधील रंगत वाढली आहे. भाजपने इथे किमान 23 जागा येतील, असा दावा यापूर्वी केला होता.

Lok sabha Results 2019 : देशभरातील निकालाचे अपडेट्स

पश्चिम बंगाल लोकसभा मतदारसंघांच्या संख्येनुसार देशात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 42 मतदारसंघ असलेल्या बंगालमध्ये भाजपने 23 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय. 2014 ला भाजपने बंगालमध्ये केवळ 2 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीने 36 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी भाजपने मोठ्या प्रमाणात आव्हान निर्माण केलंय.

constituency wise election result : मतदारसंघनिहाय निकाल कसा पाहाल?

एक्झिट पोलमध्ये भाजपला बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळताना दाखवण्यात आलंय. भाजपला 15 ते 20 जागा दाखवण्यात आल्या आहेत, तर टीएमसीला यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी 2014 च्या निकालानंतरच बंगालमध्ये रणनीती आखण्यास सुरुवात केली होती.

निकाल लाईव्ह पाहा :

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.