सर्वात मोठी बातमीः राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे नॉच रिचेबल, जळगावात खळबळ, काय घडतंय?

एरवी सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी सदा सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असणारे एकनाथ खडसे काही दिवसांपासून गायब आहेत, अशी तक्रार सर्वसामान्य कार्यकर्ते करत आहेत.

सर्वात मोठी बातमीः राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे नॉच रिचेबल, जळगावात खळबळ, काय घडतंय?
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 12:53 PM

रवी गोरे, जळगाव |  राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) अत्यंत महत्त्वच्या घडामोडी घडत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) बडे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या ८ दिवसांपासून एकनाथ खडसे नॉच रिचेबल  आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एरवी सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी सदा सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असणारे एकनाथ खडसे काही दिवसांपासून गायब आहेत. त्यांचा फोनदेखील लागत नसल्याची तक्रार सामान्य कार्यकर्ते करत आहेत.

दोन्ही फोन नॉट रिचेबल

एकनाथ खडसे यांचा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नाही. असं पहिल्यांदाच घडल्याच घडतंय, अशीही माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांचे दोन्ही फोन नंबर्स नॉट रिचेबल असल्याचं समोर आलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाची घडामोड समोर येतेय का, याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.

एकनाथ खडसे मुंबईत असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र फोनवर संपर्क होऊ शकत नसल्याने जळगावातील त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

नाथाभाऊ राष्ट्रवादीतही अस्वस्थ?

जळगाव जिल्ह्यातील बडे प्रस्थ असलेले एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे राजकारणी आहेत. मुक्ताई नगरातील ते आमदार असून त्यांनी महाराष्ट्राचं महसूल मंत्रीपदही भूषवलं आहे. 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. 2014 मध्ये ते महसूल मंत्री तसेच कृषीमंत्रीही बनवले. 2020 मध्ये भारतीय जनता पार्टीतील मतभेद आणि अस्वस्थतेमुळे त्यांनी २१ ऑक्टोबर रोजी भाजपा सोडली. 23 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2016 मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपल्यावर खोटे आरोप केल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. तेव्हापासून गिरीश महाजन एकनाथ खडसे यांच्यातील वाद आणखीच उफाळून आले.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या पक्षातही त्यांना फार मोठी संधी मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या पक्षातही ते नाराज असल्याची चर्चा आहे.

मागील आठ दिवसांपासून ते नॉट रिचेबल असल्याचं वृत्त हाती आल्याने जळगावातून आणखी काही मोठी अपडेट हाती येतेय का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.