AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून फॉल्स प्रपोगंडा राबवला जातोय, महागाई, बेरोजगारीवरुन जयंत पाटलांचा घणाघात

तिकडे अमेरिका, अफगाणिस्तानबाबत सांगितलं जातं. मात्र, इकडे सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, हे कोणी दाखवत नाही. फॉल्स प्रपोगंडा राबवला जात आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी जिंतूरच्या संवाद यात्रेत केला.

भाजपकडून फॉल्स प्रपोगंडा राबवला जातोय, महागाई, बेरोजगारीवरुन जयंत पाटलांचा घणाघात
जयंत पाटील, परभणी
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 7:25 PM
Share

परभणी : महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. आज महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीमध्ये शर्यत लागली आहे. पण बातम्यांवर काहीच दाखवले जात नाही. तिकडे अमेरिका, अफगाणिस्तानबाबत सांगितलं जातं. मात्र, इकडे सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, हे कोणी दाखवत नाही. फॉल्स प्रपोगंडा राबवला जात आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी जिंतूरच्या संवाद यात्रेत केला. (False propaganda is being carried out by BJP, Janyat Patil criticizes BJP)

भाजपचे चुकीचे धोरण समोर मांडत जनसामान्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करा. या भागात आपल्याला आपल्या विचारांचा आपला माणूस निवडून आणायचा आहे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. आज ज्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला त्यांचे जयंत पाटील यांनी स्वागत केले. विजय भांबळे यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडला त्यासाठी त्यांचे विशेष अभिनंदनही केले.

‘बुथ कमिट्या जर मजबूत असतील तर आपला पराभव अशक्य’

मागच्या विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने राष्ट्रवादीला अपयश आले. एक प्रभावी, उमद्या नेतृत्वाचा पराभव झाला. सर्व काही असताना विजय भांबळे यांना पराभव स्वीकारावा लागला. बुथ कमिट्या जर मजबूत असतील तर आपला पराभव शक्य नाही असेही जयंत पाटील म्हणाले. पक्षाला काम करणाऱ्या लोकांची गरज, मागे पुढे न पाहता संपूर्ण कार्यकारिणी झाडून काढा. कोणतीही तमा न बाळगता निष्क्रीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेशही जयंत पाटील यांनी दिले.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

आपल्या कॅडरशी संवाद साधा, त्यांच्यासाठी शिबिरं घ्या, त्यांना पक्षाबाबत पक्षाच्या कामाबाबत माहिती द्या. बुथ कमिटीच्या लोकांनी स्थानिक पातळीवर काम करावे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. त्याच्या अडीअडचणीला धावून जावे असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले. ज्या बुथ कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सर्वसमावेशक कार्यकर्त्यांची फळी असली पाहिजे. विरोधकांनी कितीही खर्च केला तरी आपलं सैन्य जर जागं असेल दगाफटका निवडणुकीत होत नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. या मतदारसंघात सर्वाधिक निधी देऊन विजय भांबळे यांचे हात मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

जिल्हा कार्यकारिणी, जिंतूरमधील पदाधिकाऱ्यांची बैठक

सकाळी जलसंपदा विभागाची बैठक आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी परभणी ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची नंतर जिंतूर विधानसभा पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. या संवाद यात्रेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी मार्गदर्शन केले. या संवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत इतर पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात जयंत पाटील यांनी स्वागत केले.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, परभणी निरीक्षक बसवराज नागराळकर, जिल्हाध्यक्ष व आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार विजय भांबळे, राजेश वीटेकर, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, मराठवाडा महिला निरीक्षक रेखा फड, महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते, मराठवाडा समन्वयक प्रज्ञाताई खोसरे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या :

‘सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचंच’, अजित पवारांची स्पष्ट कबुली!

Breaking : झेडपी आणि पंचायत समिती पोट निवडणुका पुढे ढकलण्यास निवडणूक आयोगाची असमर्थता! आता सरकारची भूमिका काय?

False propaganda is being carried out by BJP, Janyat Patil criticizes BJP

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.