चंद्रकांत पाटलांच्या राज्यपाल भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

या भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसंच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटलांच्या राज्यपाल भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 9:47 PM

रत्नागिरी : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटलांनी राज्यपालांची भेट(chandrakant patil met governor bhagat singh koshyari) घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसंच जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. आमचा राज्यपालांवर विश्वास आहे. पण, कुणाकडे काही काम नसेल आणि कुणी राज्यपालांना भेटलं तर त्यावर विश्लेषण करण्याकरता आपला वेळ वाया का घालवा? असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. ते रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. (Jayant Patil reaction on Chandrakant Patil and Governor meet )

यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अर्णव गोस्वामी यांच्यावर कोणत्याही आकसापोटी कारवाई केलेली नाही. अण्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव आल्यानं ही कारवाई केली गेली आहे. दरम्यान, पोलीस योग्य कारवाई करत आहेत. या साऱ्या प्रकरणात शरद पवारांचे काही फोटो फिरत असतील तर त्याबद्दल मला माहित नाही. ते ऑर्फ केलेले असू शकतात असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

या पत्रकार परिषदेत जयंत पाटलांनी नाणारपासून ते मंदिर सुरु करण्यापर्यंत महाविकास आघाडीचं मत सांगितलं. नाणारविषयी जयंत पाटील म्हणाले की, नाणार इथल्या जनतेचा विरोध पाहूनच नाणार रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला होता. जनतेच्या विरोधात कोणताही निर्णय होणार नाही असं जयंत पाटील यांना स्पष्ट केलं आहे. नाणार समर्थक भेटायला आल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं.

‘कोरोनाचं संकट संपलं पाहिजे’ कोरोनाच्या संकटातून राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत असताना मंदिरं खुली करण्यासाठी विरोधक पेटून उठले आहेत. पण मंदिरं चालू करणं आणि दर्शन देण्याच्या विरोधात आम्ही नाही. फक्त कोरोनाचं संकट संपलं पाहिजे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे. कोरोनाच्या जीवघेण्या संकटामध्ये मार्च महिन्यापासून धार्मिक स्थळं बंद आहेत. सध्या कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच्या संख्येत जरी वाढ झाली असली तरी धोका कायम आहे. त्यामुळे मंदिरं खुली करता येणार नाहीत अशी भूमिका महाविकास आघाडीकरून घेण्यात आला आहे.

इतर बातम्या – 

आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करु शकत नाही : जयंत पाटील

राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, महागात पडेल : चंद्रकांत पाटील

(Jayant Patil reaction on Chandrakant Patil and Governor meet )

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.