Video: जेव्हा हर्षवर्धन पाटलांचा तो व्हिडीओ जयंत पाटलांनी शरद पवारांना दाखवला!

पवारांचा हाच मूड जयंत पाटलांनी ओळखला. पुढच्या काही मिनिटांत जयंत पाटलांनी आपल्या खिशातला मोबाईल काढला आणि जुनेजाणते काँग्रेसचे माजी नेते, सध्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा सीबीआय, ईडीच्या चौकशीवरुन सूचक भाष्य केल्याचा व्हिडीओ पवारांना दाखवला.

Video: जेव्हा हर्षवर्धन पाटलांचा तो व्हिडीओ जयंत पाटलांनी शरद पवारांना दाखवला!
जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांचा व्हिडीओ शरद पवारांना दाखवला.


मुंबई :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार घेऊन ईडी सीबीआयच्या धाडी, एनसीबीची कारवाई, लखीमपूरची घटना, मावळ गोळीबार अशा अनेक विषयांवर रोखठोक मतं व्यक्त करत केंद्र सरकारवर शरसंधान साधलं. पत्रकार परिषदेची सुरुवातच पवारांनी अतिशय वेगळ्या अंदाजात केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाने पॅरीसमधल्या आयफल टॉवरवर एका मुलीला प्रपोज केल्याचं सांगत आपली मुलं कुठं जाऊन काय करतील, यावर लक्ष ठेवायला पाहिजे, असं पवार मिश्किलपणे म्हणाले. पवारांचा हाच मूड जयंत पाटलांनी ओळखला. पुढच्या काही मिनिटांत जयंत पाटलांनी आपल्या खिशातला मोबाईल काढला आणि जुनेजाणते काँग्रेसचे माजी नेते, सध्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा सीबीआय, ईडीच्या चौकशीवरुन सूचक भाष्य केल्याचा व्हिडीओ पवारांना दाखवला.

जयंत पाटलांनी हर्षवर्धन पाटलांचा व्हिडीओ पवारांना दाखवला!

सध्या हर्षवर्धन पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेडिंगवर आहे. तो व्हिडीओ आहे, हर्षवर्धन पाटलांनी बोलता बोलता केलेल्या गंभीर विधानाचा…! त्याचं झालं असं की एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमाला हर्षवर्धन पाटील मावळला गेले होते. मंचावर विविध पक्षाचे नेते हजर होते. हर्षवर्धन पाटलांची भाषणाची वेळ आली. आता पाटलांचं भाषण म्हणजे खुमासदार शैली आणि किस्स्यांची पेरणी पेरणी… आपल्या भाषणात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून सगळं कसं व्यवस्थित चाललंय हे सांगताना आता कोणतीही चौकशी नसल्याने शांत झोप येते, असं म्हटलं. म्हणजेच बोलता बोलता त्यांनी सूचक पण तितकंच गंभीर विधान केलं.

सध्या ईडी, सीबीआयच्या धाडींचा धडाका आहे. भाजपेतर पक्षांच्या नेतेमंडळींवर ईडी-सीबीआय-आयकर विभागाच्या धाडी पडतात. केंद्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करते, असा आरोप अनेक वेळा विरोधी पक्ष करतात. त्यातच हर्षवर्धन पाटलांच्या म्हणण्याने एकप्रकारे त्यावर शिक्कामोर्तबच झालं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चौकशी होत नाही, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता.

ईडी-सीबीआय-आयकराच्या धाडीवरुन पवार भाजपवर बरसत होते, त्याचवेळी…!

हर्षवर्धन पाटलांचा हाच व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जयंत पाटलांनी हाच व्हिडीओ शरद पवारांना दाखवला. ते ही अगदी अचूक क्षणी…! आपल्या पत्रकार परिषदेत ईडी-सीबीआय-आयकरच्या धाडीवरुन पवार विरोधकांवर बरसत होते. त्याचवेळी जयंत पाटलांनी हर्षवर्धन पाटलांचा व्हिडीओ पवारांना दाखवला.

हर्षवर्धन पाटील मावळात नेमकं काय म्हणाले होते?

हर्षवर्धन पाटील हे आपलं खुमासदार भाषण आणि मिश्किल वक्तव्यांमुळं चांगलेच चर्चेत असतात. मावळमध्ये बोलताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, याचं उत्तर त्यांनी दिलं. ‘स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. पाटलांच्या या वक्तव्यानं स्टेजवर उपस्थित सर्वांच खळखळून हसले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI