AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांचे बाप नव्हते तेव्हापासून भाजपमध्ये काम केलं, आता आयत्या पिठावर रेघा मारत आहेत, जयसिंगरावांचा हल्लाबोल

"भाजपमध्ये अस्वस्थ व्हायचं. कोंडमारा झाल्यासारखं वाटायचं. या लोकांच्या पाठीमागे उभं राहणं शक्य नाही. त्यामुळे मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला", असं जयसिंगराव यांनी सांगितलं (Jaysingrao Gaikwad slams BJP leaders).

त्यांचे बाप नव्हते तेव्हापासून भाजपमध्ये काम केलं, आता आयत्या पिठावर रेघा मारत आहेत, जयसिंगरावांचा हल्लाबोल
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 24, 2020 | 4:38 PM
Share

मुंबई : “एवढ्या वर्षांपासून आम्ही केलं. आंदोलन, उपोषण, किती मेहनत केली. पोलिसांच्या लाठ्या खाल्या. भाजपमध्ये आता जे आहेत त्यापैकी कुणीच नव्हतं. तेच काय त्यांचे बापही नव्हते. बाप म्हणजे आदराने बोलतोय. आता जे आहेत त्यांना विचारा कुणीतरी की, तुम्हाला पोलिसांनी मारहाण केली का, तुम्ही मोर्चा काढला का, उपोषण केलं का? काही नाही फक्त आयत्या पिठावर हे रेघा मारायला आले आहेत. आता मी आलोय साहेब. येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे. ते आता सगळेच बाहेर येणार आहेत”, असा घणाघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जयसिंगराव गायकवाड यांनी केला (Jaysingrao Gaikwad slams BJP leaders).

जयसिंगराव गायकवाड यांचा आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, अनिल देशमुख, धनंजय मुंडे यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते. यावेळी जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केली (Jaysingrao Gaikwad slams BJP leaders).

“17 नोव्हेंबरला मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. मान-सन्मान नाही, कामाची कदर नाही, केलेल्या कामाचं कौतुक नाही, चांगल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, अशा पक्षात कोण राहील? गेली 12 वर्ष भाजपसोबत होतो. राष्ट्रवादी सोडल्याचा मला पश्चात्ताप होतोय. पण आता प्रायश्चित्त करतो आहे. भाजप नेते नितीन गडकरी आमचे मित्र आहेत. पण आज त्यांचीही काय अवस्था आहे हे तुम्हालाही माहिती आहे. एखाद्या कुख्यात अतिरेक्याने भाजपला ताब्यात घ्यावं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे”, अशी टीका जयसिंगराव गायकवाड यांनी केला.

“भाजपमध्ये अस्वस्थ व्हायचं. कोंडमारा झाल्यासारखं वाटायचं. या लोकांच्या पाठीमागे उभं राहणं शक्य नाही. त्यामुळे मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एखाद्या गोडाऊनमधून बाहेर आल्यावर आपण जसा मोकळा श्वास घेतो, तसा मी आता मोकळा श्वास घेतोय”, असं जयसिंगराव यांनी सांगितलं.

“कुणाला साथ द्यायची, कुणाची घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे मनमानी चालली आहे. कामाचा पत्ता नाही. पण मी पणा भरपूर आहे. अशा लोकांशी कसं काम करायचं?”, असा सवाल जयसिंगराव यांनी केला.

“कुणाचं काम करायचं? मी जेव्हा निवडून आलेलो तेव्हा एकूण 34 उमेदवार होते. तरीही मी 20 हजार मतांच्या फरकाने जिंकून आलो होतो. विशेष म्हणजे उर्वरित 33 उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली होती. ते रेकॉर्ड अजूनही कुणी मोडलेलं नाही. पण आता मी ठरवलंय महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा द्यायचा, 40 हजार मतांच्या फरकाने जिंकून आणायचं”, असा निर्धार जयसिंग गायकवाड यांनी केला.

जयसिंगराव गायकवाड कोण आहेत?

जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे जेष्ठ नेते होते. प्रमोद महाजन गोपीनाथ मुंढे यांच्या बरोबर जयसिंगराव गायकवाड यांनी राजकारणाला सुरुवात केली.

जयसिंगराव गायकवाड हे पूर्वी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत. तर एक वेळा राज्यात मंत्री पदही उपभोगलं आहे. त्यांनी सहकार मंत्री म्हणून युती सरकारच्या काळात कामकाज पाहिलं आहे.

जयसिंगराव गायकवाड हे बीड लोकसभा मतदारसंघातून तब्बल तीन वेळा खासदार राहिले आहेत. तर एक वेळा केंद्रात पेट्रोलियम मंत्रालयाचा राज्यमंत्री पदाचा कार्यकाळ त्यांनी सांभाळला आहे.

याच काळात जयसिंगराव गायकवाड यांनी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंढे यांच्या विरोधात बंड करत भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर काही काळ ते राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादी निराशा आल्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत गेले मात्र शिवसेनेतही फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी पुन्हा भाजप मध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजप मध्ये उपेक्षा होत असून कुठलंही काम दिलं जात नसल्याचा आरोप करत त्यांनी भाजपलाही सोडचिठ्ठी दिली आहे. आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत त्यांना कुठलं स्थान दिलं जाणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे

जयसिंगराव गायकवाड यांची कारकीर्द

माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री माजी सहकार राज्यमंत्री माजी मराठवाडा पदवीधर आमदार (विधानपरिषद – दोन वेळा) माजी खासदार – बीड (तीन वेळा)

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार

सदाशिव पाटील – काँग्रेस (खानापूर आटपाडी, सांगली) उदेसिंग पाडवी – भाजप (शहादा, नंदुरबार) सीताराम घनदाट (घनदाट मामा) – अपक्ष (गंगाखेड, परभणी) रमेश कदम – राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस (चिपळूण, रत्नागिरी) (Jaisingrao Gaikwad to enter NCP in presence of Sharad Pawar) एकनाथ खडसे – भाजप (मुक्ताईनगर, जळगाव) राजीव आवळे – जनसुराज्य (हातकणंगले, कोल्हापूर) जयसिंगराव गायकवाड – भाजप (विधानपरिषद आमदार/बीड खासदार)

संबंधित बातम्या :

भाजप हा मस्तीत आलेला पक्ष, त्यांना धडा शिकवणार, जयसिंगराव गायकवाड यांचा एल्गार

केंद्रीय राज्यमंत्रिपद भूषवलेला मराठवाड्यातील भाजप नेता ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ