AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरात विधानसभा निकाल 2022: काँग्रेसचे जिग्नेश मेवाणी पुन्हा पिछाडीवर

काँग्रेसचे जिग्नेश मेवाणी पुन्हा पिछाडीवर

गुजरात विधानसभा निकाल 2022:  काँग्रेसचे जिग्नेश मेवाणी पुन्हा पिछाडीवर
| Updated on: Dec 08, 2022 | 9:14 AM
Share

मुंबई : काँग्रेसचे जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) पुन्हा पिछाडीवर आहेत. तरूणांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे  युवा नेते जिग्नेश मेवाणी यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ते सध्याच्या कलांनुसार पिछाडीवर आहेत. वडगाव मतदार संघातून ते निवडणूक लढवत आहेत. पहिल्या कलानुसार या मतदार संघात त्यांना कमी मतं पडल्याचं चित्र आहे. आज गुजरात विधानसभा निवडणुकीचा (Gujarat Election 2022) निकाल लागतोय.  आपने भाजपला चांगली लढत दिली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये कोण जिंकतं हे पाहणं महत्वाचं असेल.

जिग्नेश यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे बडे नेते मैदानात उतरले होते. मात्र सध्या ते पिछाडीवर आहेत.

हार्दिक पटेलही पिछाडीवर

भाजपचे युवा नेते हार्दिक पटेलही पिछाडीवर आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत. अहमदाबादमधल्या वीरमगाम मतदारसंघात हार्दिक पटेल निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांचा मुकाबला काँग्रेसचे लाखा भरवाड यांच्याशी होतोय. मागच्या दोन टर्मपासून इथं काँग्रेसचा आमदार आहे.

गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली. बहुमतासाठी 92 ही मॅजिक फिगर असणार आहे. सत्ताधारी भाजपाला 117 ते 151जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. भाजपने अनेक महत्त्वाचे नेते, केंद्रीय मंत्री यांसह विविध राज्यांतील मातब्बर नेते प्रचारासाठी गुजरातमध्ये उतरवले होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये तब्बल 35 सभा घेतल्या. तर आम आदमी पार्टीनेही तगडा प्रचार केला.

2017 विधानसभा निवडणुकीचा निकाल काय?

भाजपा – 99

काँग्रेस – 77

अपक्ष – 3

भारतीय ट्रायबल पार्टी – 2

राष्ट्रवादी काँग्रेस – 1

गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान झालं. यामध्ये 61 पक्षांचे 833 उमेदवार उभे होते. तर दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 विधानसभा जागांवर मतदान झालं. यामध्ये 788 उमेदवार रिंगणात उतरले होते. गुजरातमध्ये कुठल्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी किमान 92 जागा जिंकणं आवश्यक आहे.92 मॅजिक फिगर आहे. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 182 पैकी 99 जागा जिंकून भाजपने सरकार स्थापन केलं होतं.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.