‘रयत’वरुन आमदार महेश शिंदेंचा पवारांना खोचक टोला, आता जितेंद्र आव्हाडांचं शिंदेंना प्रत्युत्तर

ज्या माणसाबाबत आपण बोलत आहोत, त्याच्यासमोर आपलं कर्तृत्व किती आहे, हे कधीतरी तपासा. बोलायचं म्हणून तुम्ही खूप बोलू शकता, बोलायला तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही. फक्त स्वत:ची लाज स्वत:च्या हाताने घालवू नका. तुम्ही उंचीने किती मोठे आहात याच्याशी काही देणघेणं नाही. फक्त तुमचा मेंदू कुठे आहे ते एकदा तपासून पाहा, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर केलीय.

'रयत'वरुन आमदार महेश शिंदेंचा पवारांना खोचक टोला, आता जितेंद्र आव्हाडांचं शिंदेंना प्रत्युत्तर
जितेंद्र आव्हाड, महेश शिंदे, शरद पवार

मुंबई : साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Education Society) अध्यक्षपदावरुन कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना खोचक टोला लगावलाय. जनतेचा विचार करून शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं खोचक वक्तव्य शिंदे यांनी केलंय. शिंदे यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय.

पवारसाहेबांवर वैयक्तिक टीका करुन आपण फार कर्तृत्ववान आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या गावातला कोण महेश शिंदे यांची गौरी शंकर नावाची शिक्षण संस्था आहे. काय झालं या शिक्षण संस्थेत? क्लार्क, प्राध्यापकांचा पगार नाही. विद्यार्थ्यांच्या फी बाबत अतापता नाही. तुम्ही घेतलेल्या साखर कारखान्याचं काय झालं ओ? शिक्षणसंस्था चालवायला अक्कल लागते. तुम्ही शरद पवार यांच्या उंचीच्या फक्त 2 इंच कमी आहात, असं तुम्ही तुमच्या वक्तव्यात म्हटलं आहे. शरद पवार हे उंचीमुळे ओळखले जात नाहीत, तर त्यांच्या कर्तृत्वामुळे ओळखले जातात. रयत शिक्षण संस्था ज्या उद्देशानं बनवली होती, बहुजनांच्या हितासाठी. तिचा ज्या पद्धतीने फैलाव झाला. ज्या पद्धतीने तिची पाळमुळं गाव खेड्यापर्यंत पोहोचली, त्यामागे फक्त पवारसाहेब आहेत. तेव्हा ज्या माणसाबाबत आपण बोलत आहोत, त्याच्यासमोर आपलं कर्तृत्व किती आहे, हे कधीतरी तपासा. बोलायचं म्हणून तुम्ही खूप बोलू शकता, बोलायला तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही. फक्त स्वत:ची लाज स्वत:च्या हाताने घालवू नका. तुम्ही उंचीने किती मोठे आहात याच्याशी काही देणघेणं नाही. फक्त तुमचा मेंदू कुठे आहे ते एकदा तपासून पाहा, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर केलीय.

आमदार महेश शिंदेंचा पवारांना टोला

रयतचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, अशी भूमिका होती. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली,असल्याचा आरोप महेश शिंदे यांनी केलाय. रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दुःख वाटत असल्याचे आमदार शिंदे म्हणाले.जनतेचा विचार करून शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं खोचक वक्तव्य शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.

रयतमध्ये नोकरी लावण्यासाठी 40 लाख मागितले जातात!

महेश शिंदे यांनी रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. आज रयत मध्ये नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने 40 लाख रुपये मागितले जात असल्याच्या चर्चा असल्याचा गंभीर आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. बारामतीच्या एकाच व्यक्तीला रयतचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

इतर बातम्या : 

गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत पवार, राऊतांचं मोठं भाकित, चंद्रकांतदादा म्हणतात ‘मुख्यमंत्री कधी बाहेर पडणार ते सांगा’!

शरद पवारांनी कोणत्या अधिकारात एसटीबाबत बैठक घेतली? भाजपच्या प्रश्नाला आता पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

Published On - 10:53 pm, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI