मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का? : जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त पुस्तकावरुन शिवसेनेवर तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला चढवला.

मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का? : जितेंद्र आव्हाड

मुंबई :  राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त पुस्तकावरुन शिवसेनेवर तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला चढवला. जाणते राजे फक्त शिवाजी महाराजच आहेत, अन्य कोणी नाही, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर पलटवार केला. (Jitendra Awhads answer to Udayanraje Bhonsle)

“उदयनराजेंवर बाबासाहेब पुरंदरेंचे संस्कार आहेत. आपण एखाद्याला लोकनायक म्हणतो, लोकनेते म्हणतो. तसं शरद पवार यांना जाणते राजे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आपण कुणाला म्हणत नाही. कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जातं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

होय शरद पवार हेच जाणता राजा. महाराष्ट्रात सर्व प्रश्नांची जाणीव त्यांना आहे, म्हणून अनेकजण त्यांचं बोट हातात घेऊन राजकारण करतो, असं म्हणत आव्हाडांनी उदयनराजेंना टोला लगावला.

“शरद पवार जाणते राजेच आहेत. 1960 ते 2020 पर्यंत त्यांनी काम केलं. 60 वर्षांचा अनुभव आहे. 90  च्या दशकात उदयनराजेंना फक्त 156 मतं मिळाली होती साताऱ्यात. शिवाजींच्या वारसाबद्दल सातारकरांचं मत काय हे त्यांनी त्या वेळी दाखवून दिलं होतं. शरद पवार साहेबांनी हात काढला फक्त तर लोकसभेत काय झालं, हे भारतानं पाहिलं. आम्हाला कुणालाही उदयनराजेंच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही”, असा हल्लाबोल आव्हाडांनी केला.

गादीचा सन्मान आहे, वारसांनी स्वत:ला शिवाजी महाराज समजण्याची कृपा करू नये, असा सल्लाही आव्हाडांनी उदयनराजेंना दिला.

उदयनराजे काय म्हणाले?

जाणता राजा उपमा देताना शिवाजी महाराजांनी त्या काळात काय केलं ते पाहावं, महाराजांनी कार्यपद्धतीने जगाला आपलं कर्तृत्व दाखवून दिलं.  स्वतःला जाणता राजा म्हणून घेण्याचा दुसरा कोणाचा अधिकार नाही. सो कॉल्ड जाणते राजे कोणी त्यांना उपमा दिली माहिती नाही. कोणताही पक्ष असला तरी सोयीप्रमाणे सर्वजण छत्रपती शिवरायांचं नाव का घेता.  त्यांचं आचरण केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. हे तुम्ही लोकांनी निवडून दिलेले लोकशाहितले राजे जाणते राजे म्हणे. राज्याच्या खेळळांडो केलाय, किळस वाटते.

शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं का?

शिवसेना जेव्हा काढली त्याला नाव दिले तेव्हा तुम्ही वंशजाना विचारायला आला होता का, महाशिवआघाडी नाव ठेवले तेव्हा विचारले का? शिव का काढून टाकले? सोईप्रमाणे हे लोक वापर करतात, ही यांची लायकी. शिव वडा, हे वडा अरे महाराजांना काय आदराचे स्थान ठेवा ना, वडा पवा हे काय? आमदार प्रकाश गजभिये यांच्यावर टीका करताना थर्डक्लास कोणतरी आहे, असं उदयनराजे म्हणाले.

(Jitendra Awhads answer to Udayanraje Bhonsle)

संबंधित बातम्या 

सेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली, बाळासाहेबांचा वर का? शिवसेना नाव काढून ‘ठाकरे सेना’ करा : उदयनराजे  

जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय, उदयनराजेंचा हल्लाबोल, पवार, ठाकरेंवर घणाघात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI