AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या’, ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची मागणी!

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जाऊ लागला होता. मात्र, तो जोर धरताना दिसून आला नाही. अशावेळी ईव्हीएम की बॅलेट पेपर असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केलीय.

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या', ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची मागणी!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीImage Credit source: TV9
| Updated on: Mar 13, 2022 | 7:54 PM
Share

मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) आता महाराष्ट्रातील काही महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) होणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जाऊ लागला होता. मात्र, तो जोर धरताना दिसून आला नाही. अशावेळी ईव्हीएम की बॅलेट पेपर (ballot paper) असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केलीय.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून बॅलेट पेपरचा मुद्दा उपस्थित केलाय. ‘अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या. तो राज्याचा निर्णय असतो. महाराष्ट्रानेही येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’, अशी मागणी आव्हाड यांनी केलीय.

मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडणार

कर्नाटकमध्ये ज्या प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या. त्याचप्रमाणे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत शंका-कुशंका आहेत. त्यामुळे प्रयोग म्हणून तरी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी आपली मागणी आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

बॅलेट पेपरचा मुद्दा अनेकदा उपस्थित

ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेण्यास सुरुवात झाल्यापासून अनेकदा त्यावर आक्षेप घेण्यात आले. ईव्हीएममध्ये फेरफार करुन एकाच पक्षाकडे मतं वळवली जात असल्याचा आरोप अनेकदा झाला. त्यावेळी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीही अनेकदा करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं आवाहन दिलं होतं. महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्या, या भारतीय जनता पक्षाच्या आव्हानाला काँग्रेसनेही प्रतिआव्हान दिलेय. भाजपमध्ये हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे प्रतिआव्हान पटोले यांनी दिलं होतं.

‘ईव्हीएम’ म्हणजे काय?

‘ईव्हीएम’ अर्थातच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन. पारपंरिक मतदानाची पद्धत मतपेट्या कालबाह्य होऊन मतदान आणि मतमोजणीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) या आधुनिक उपकरणाचा वापर करण्यात येतो. ‘ईव्हीएम’चे मुख्यत्वे बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU ), व्होटर व्हेरिफाइबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन (VVPAT) असे तीन भाग असतात. मतदान अधिक पारदर्शी करण्यासाठी 2010 नंतर ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करण्यास सुरूवात झाली आहे.

इतर बातम्या :

CWC Meeting : ‘देशाला मिळालेलं स्वातंत्र्य जनतेला सोबत घेऊन वाचवू’, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, कोणत्या मुद्द्यांवर खल?

‘फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष’, संजय राऊतांचा पलटवार; खोटं न बोलण्याचाही सल्ला!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.