जेपी नड्डांची भाजपच्या निवडणूक प्रभारींसोबत बैठक; पंकजा, तावडे, शेलार उपस्थित राहणार

जेपी नड्डांची भाजपच्या निवडणूक प्रभारींसोबत बैठक; पंकजा, तावडे, शेलार उपस्थित राहणार

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या बैठकीला भाजपचे नवनिर्वाचित निवडणूक प्रभारी उपस्थित राहणार आहेत.

अनिश बेंद्रे

|

Nov 18, 2020 | 11:27 AM

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (Jagat Prakash Nadda) उद्या (गुरुवार 19 नोव्हेंबर) नवनिर्वाचित निवडणूक प्रभारींची बैठक घेणार आहेत. पंकजा मुंडे (Pankaja Munde), विनोद तावडे (Vinod Tawde), आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी बैठकीला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. (JP Nadda to hold a meeting with newly appointed state in-charges of BJP)

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येईल. बैठकीला भाजपचे नवनिर्वाचित निवडणूक प्रभारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार यांचा समावेश आहे. खरं तर विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या, तर तिकीट डावलल्याने तावडेही नाखुश असल्याचं बोललं जात असे. परंतु पक्षाने त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लावल्याने या चर्चाही हवेत विरल्या.

(JP Nadda to hold a meeting with newly appointed state in-charges of BJP)

कोणाला कुठली जबाबदारी?

मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे भाजपने हरियाणाचे प्रभारीपद सोपवले आहे.

त्रिपुरात डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे नेते सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर करण्यात आली.

संबंधित बातम्या :

विनोद तावडेंची सेकंड इनिंग; राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणार?

तावडे-पंकजांनंतर आशिष शेलारांना केंद्रीय नेतृत्वाकडून नवी जबाबदारी

(JP Nadda to hold a meeting with newly appointed state in-charges of BJP)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें