AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: बिकॉज I love Congress, कर्नाटकच्या जेडीएस आमदाराचं खुल्लम खुल्ला काँग्रेस प्रेम

जे फितूर झाले आहेत किंवा पक्षावर नाराज आहेत, असे आमदार इतर पक्षांच्या उमेदवाराला मत देतात. यालाच क्रॉस वोटिंग म्हणतात. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एखाद्या आमदाराने क्रॉस वोटिंग केले तरी त्याची आमदारकी रद्द होत नाही पण पक्ष त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकतो.

Rajya Sabha Election 2022: बिकॉज I love Congress, कर्नाटकच्या जेडीएस आमदाराचं खुल्लम खुल्ला काँग्रेस प्रेम
श्रीनिवास गौडा, जनता दल सेक्युलर पक्षाचे आमदार
| Updated on: Jun 10, 2022 | 3:35 PM
Share

बंगळुरूः राज्यसभा निवडणुकांसाठी (Rajyasabha Election) देशातील चार राज्यांमध्ये रणसंग्राम सुरु असतानाच कर्नाटकातील (Karnataka Election) दोन  आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे जनता दल (S) च्या यापैकी एका आमदारानं काँग्रेसला मत दिल्याचं खुलेआम जाहीर केलं आहे. माझं काँग्रेसवर प्रेम आहे, त्यामुळेच मी या पक्षाला मत दिल्याचं त्यांनी सांगितलं. जदयूच्या आमदाराचं (Janata Dal) हे काँग्रेसप्रेम सध्या चांगलंच चर्चिल्या जातंय. देशातील चार राज्यांमध्ये आज राज्यसभा सदस्यांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 6, राजस्थानात 4, हरियाणात 2 आणि कर्नाटकात 4 जागांचा यात समावेश आहे. कर्नाटकमधील चार सदस्य राज्यसभेवर जाणार आहेत. पण उमेदवार सहा आहेत. त्यामुळे चौथ्या जागेसाठी भाजप, काँग्रेस आणि जदयूमध्ये चुरस पहायला मिळत आहे. त्यातच जनता दल (S) आमदार श्रीनिवास गौडा  आणि श्रीनिवास गुब्बी यांनी क्रॉस वोटिंग केलं आहे. याविषयी त्यांनी केलेलं ट्विटदेखील चांगलंच चर्चेत आहे.

बाहेर पडताना म्हणाले I Love Congress

जनता दल (S) चे आमदार श्रीनिवास गौडा यांनी आज सकाळी मतदान केलं. विधानभवनातून ते बाहेर पडत असताना त्यांनी कुणााला मतदान केलं, असा प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेसला मत दिल्याचं सांगितलं. त्यासोबत Because I love it, असं उत्तर दिलं. श्रीनिवास गौडा यांनी यापूर्वीदेखील जनता दल सेक्युलर सोडून काँग्रेसमध्ये जाण्याविषयी वक्तव्य केलं होतं.

कर्नाटक राज्यसभा निवडणुकीचं चित्र काय?

224 सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसकडे 70, भाजपाकडे 121 तर जदयूकडे 32 आमदार आहेत. राज्यसभेच्या खासदारपदी निवड होण्यासाठी प्रत्येक सदस्याला 45 मतांची गरज आहे. त्यानुसार, भाजपाचे दोन, काँग्रेसचा एक असे तीन सदस्य सहजपणे निवडून येऊ शकतात. पण चौथ्या जागेसाठी चुरस पहायला मिळत आहे. या जागेसाठी तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

मातब्बर उमेदवार रिंगणात

कर्नाटकात राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मात्तब्बर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ते पुढीलप्रमाणे- काँग्रेस- जयराम रमेश, मन्सूर अली खान भाजप- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अभिनेते जग्गेश, आमदार लहेर सिंह सिरोया जदयू- रिअल इस्टेट क्षेत्रातील डी. कुपेंद्र रेड्डी

क्रॉस वोटिंगमुळे गोंधळ

राज्यसभेतील सदस्यांच्या विजयासाठी कर्नाटकातील तिन्ही पक्षांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. मात्र ऐन मतदानाच्या वेळी जदयूचे आमदार श्रीनिवास गौडा आणि श्रीनिवास गुब्बी यांनी क्रॉस वोटिंग केले. मी काँग्रेसला मत टाकणे योग्य वाटते, त्यामुळे मी असे केल्याचेही त्यांनी खुले आम सांगितलं. यावर जदयू प्रमुख कुमारस्वामी यांचीही प्रतिक्रिया आली. काँग्रेस ही भाजपाची बी टीम असून त्यांनी आपला खरा चेहरा दाखवलाच, असा आरोप त्यांनी केला. कर्नाटकातील भाजपाच्या उदयामागे काँग्रेसच मुख्य दोषी आहे, असंही ते म्हणाले. कर्नाटकातील आणखी काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं वृत्त आहे.

क्रॉस वोटिंग म्हणजे काय?

राज्यसभेच्या सदस्य निवडणुकीसाठी जे आमदार मतदान करतात, त्यांनी आपले मत आपापल्या पक्षाच्या एजंटला (प्रतिनिधीला) दाखवणे अनिवार्य असते. बहुतांश आमदार आपल्या पक्षालाच मतदान करतात. मात्र जे फितूर झाले आहेत किंवा पक्षावर नाराज आहेत, असे आमदार इतर पक्षांच्या उमेदवाराला मत देतात. यालाच क्रॉस वोटिंग म्हणतात. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एखाद्या आमदाराने क्रॉस वोटिंग केले तरी त्याची आमदारकी रद्द होत नाही पण पक्ष त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकतो.

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....