आमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही

काँग्रेसने आणि जेडीएस सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जायचे आहे. पण यापूर्वीच बंडखोर आमदारांनी आम्ही विश्वासमत प्रक्रियेदरम्यान विधानसभेत उपस्थित राहणार नाही, असा व्हिडीओ शेअर केला आहे.

आमदारांचे 'कर नाटक' सुरु, उद्या बहुमत चाचणीसाठी जाणार नाही

बंगळुरु : कर्नाटकमधील राजकीय नाट्य दिवसेंदिवस वाढत जात आहेत. काँग्रेस आणि जनता दलाच्या (सेक्युलर) (JDS and Congress) आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार संकटात आले आहे. उद्या (22 जुलै) काँग्रेसने आणि जेडीएस सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जायचे आहे. पण यापूर्वीच बंडखोर आमदारांनी आम्ही विश्वासमत प्रक्रियेदरम्यान विधानसभेत उपस्थित राहणार नाही, असा व्हिडीओ शेअर केला आहे.

बंडखोर आमदारांच्या या भूमिकेमुळे उद्या जेडीएस आणि काँग्रेस (JDS and Congress) सरकारला बहुमत स्पष्ट करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. तर भाजप सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे मागणी करत आहे. कर्नाटकाच्या या राजकीय नाट्याला उद्या वेगळं वळण लागण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे.

आज बंडखोर आमदारांपैकी अकरा आमदारांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. आम्ही कोणत्याही दबावाखाली राजीनामा दिलेला नाही. तसेच आम्ही उद्या होणार्‍या बहुमत चाचणीत उपस्थित राहणार नाही, असे ते म्हणाले.

बंडखोर आमदारांनी आणखी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामध्ये ते पुन्हा म्हणाले, आम्ही कोणत्याही दबावाखाली नाही आहोत. आम्ही एकत्र आहोत. कर्नाटकच्या जनतेला स्थिर सरकार हवे आहे. आम्ही स्वाभिमानासाठी राजीनामा देत आहोत. तसेच उद्या बहुमत चाचणीसाठी आम्ही उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी या व्हिडीओतून सांगितले.

कर्नाटकमधील सरकार टिकवण्यासाठी बंडखोरांचे सर्मथन गरजेचे आहे. दोन दिवस बहुमत लांबणाऱ्या काँग्रेस आणि जेडीएस सरकारला उद्या कोणत्याही परिस्थितीत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. नाहीतर त्यांचे सरकार कोसळू शकते. पण हे सरकार वाचवू शकणारे बंडखोर आमदार मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

संबंधित बातम्या : 

मायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला

कर्नाटकची बहुमत चाचणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलली, काँग्रेस पुन्हा सुप्रीम कोर्टात

कर्नाटक विधानसभेचं कामकाज स्थगित, भाजपचे आमदार रात्रभर सभागृहातच झोपणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *