किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणात आता दिल्लीचं लक्ष! CISF पथकाकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट; वेगळा गुन्हा दाखल होणार?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही एक पत्र लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर आता सोमय्या धक्काबुक्की प्रकरणात दिल्लीने लक्ष घातल्याचं पाहायला मिळत आहे. सीआयएसएफच्या एका पथकाने आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करण्याची मागणी सीआयएसएफकडून पुणे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणात आता दिल्लीचं लक्ष! CISF पथकाकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट; वेगळा गुन्हा दाखल होणार?
किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांचा हल्ला
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 9:22 PM

पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना शनिवारी पुण्यात काही शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. त्यात सोमय्या यांना दुखापतही झाली आहे. या प्रकरणानंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सोमय्या यांच्यावरील झालेल्या हल्ल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. पुणे पोलिसांवर (Pune Police) राज्य सरकारचा दबाव आहे. त्यामुळेच आरोपींवर गंभीर गुन्ह्याचे कलम लावण्यात आले नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनाही एक पत्र लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर आता सोमय्या धक्काबुक्की प्रकरणात दिल्लीने लक्ष घातल्याचं पाहायला मिळत आहे. सीआयएसएफच्या एका पथकाने आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करण्याची मागणी सीआयएसएफकडून पुणे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणते वळण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.

11 फेब्रुवारीला महापालिकेच्या पायऱ्यांवरच सोमय्यांचा सत्कार

दरम्यान, सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी भाजपचं शिष्टमंडळ आज पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं होतं. त्यात महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजप नगरसेवकांचा समावेश होता. या भेटीनंतर बोलताना जगदीश मुळीक म्हणाले की, आम्ही पोलीस कारवाईवर समाधानी नाही. महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव आणत आहे. त्यांना हिंसा करत महापालिकेत सत्ता आणायची आहे. यापुढे कलम वाढवून नवीन कलमं लावली पाहिजेत, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय.

इतकंच नाही तर भाजपकडून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना पुण्यात येण्याचं निमंत्रण देण्यात येणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या यांना पुण्यात बोलावलं जाणार आहे. महापालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच पायऱ्यांवर सोमय्या यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहितीही जगदीश मुळीक यांनी दिलीय. 11 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता सोमय्या यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं पुणे भाजपकडून सांगण्यात आलं.

महापौरांनी महापालिका आयुक्तांकडे मागितलं उत्तर

पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून अहवाल मागितला आहे. किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेला भेट देण्यासाठी आले असता त्यांना महापालिका आवारात शिवसैनिकांमार्फत धक्काबुक्की करण्यात आली. सदर बाब ही अत्यंत गंभीर असल्यानं या प्रसंगामुळे पुणे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याबाबत पुणे महापालिकेला अवगत करण्यात आले असतानाही योग्य ती सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही? तसंच शनिवारी साप्ताहिक सुट्टीचा दिवस असतानाही त्या वेळेत उपस्थित शिवसैनिकांना पुणे महापालिकेच्या आवारात प्रवेश कसा मिळाला अथवा कुणी दिला? आपल्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत आपणामार्फत माननीयांस का अवगत करण्यात आले नाही? याबाबत सर्व प्रश्नांचा खुलासा आम्हास लेखी स्वरुपात तत्काळ कळविण्यात यावा, असं पत्र मोहोळ यांनी पुणे महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आलं आहे. तशी माहिती खुद्द सोमय्या यांनीच ट्वीटद्वारे दिलीय.

इतर बातम्या : 

Video : ‘अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं’, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप, अजितदादा काय उत्तर देणार?

Pune : किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी शिवसैनिक पोलीस ठाण्यात हजर, सोमय्या राज्यपालांच्या भेटीला

धक्काबुक्की प्रकरण: ‘ते’ शिवसैनिक स्वतः पोलिसात होणार हजर होणार; सोमय्यांचा नवा आरोप काय?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.