Video : ‘अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं’, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप, अजितदादा काय उत्तर देणार?

अजित पवार हे हेलिकॉप्टरने जमिनी शोधत असतात, कुणाची जमीन शिल्लक आहे. अजित पवार धरणाची जमीनही सोडत नाहीत. लोकांमध्ये अजित पवारांची भीती आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांवर जोरदार निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील आज पुण्यातील मांजरी या गावातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

Video : 'अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं', चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप, अजितदादा काय उत्तर देणार?
चंद्रकांत पाटील, अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 6:24 PM

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री, तसंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात अनेकदा आरोप-प्रत्यारोपांच्या (Allegations) फैरी झडताना महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर एक गंभीर आरोप केलाय. अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचं, जमिनी लाटण्याचं काम केलं. अजित पवार हे हेलिकॉप्टरने जमिनी शोधत असतात, कुणाची जमीन शिल्लक आहे. अजित पवार धरणाची जमीनही सोडत नाहीत. लोकांमध्ये अजित पवारांची भीती आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांवर जोरदार निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील आज पुण्यातील मांजरी या गावातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

चंद्रकांत पाटलांचा नेमका आरोप काय?

‘अडाणी म्हाताऱ्या माणसालाही हे माहिती आहे की 6 हजार रुपये मोदी देतात. आता मग तो मत मोदींना देणार की पवारांना देणार? की ज्यांनी आयुष्यभर पैसे लोकांचे पैसे काढून घेण्याचंच काम केलं. जमिनी काढून घेण्याचं काम केलं. मला असं कळलं की मांजरीवाल्यांना काही वर्षापूर्वी महापालिकेत दाखल करुन घेण्यात आलं होतं. तेव्हा ते नको बोलले कारण पवार आमच्या जमिनी लाटून घेतात. म्हणून पुन्हा ते महापालिकेतून काढून घेण्यात आलं. एकदा गेले होतो महापालिकेत पण अजित पवारांची इतकी भीती की, म्हणाले आमच्या जमिनीवर आरक्षण टाकतील आणि घेऊन जातील. ते हेलिकॉप्टरने वरुन बघतात की कुणाकुणाच्या जमिनी शिल्लक आहेत. धरणाच्या सोडत नाहीत, कशाच्याच सोडत नाहीत. त्यामुळे लोकांना हे कळतं की मोदी 6 हजार रुपये देतात, कोरोना लस देतात, गरोदर स्त्रिला 6 हजार रुपये देतात, रेशन फ्री देतात, टॉयलेट फ्री देतात, गॅस फ्री देतात’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

अजित पवार काय उत्तर देणार?

चंद्रकांत पाटील यांनी गंभीर आरोप केल्यामुळे आता अजित पवार नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यापूर्वी अजित पवारांनी अनेकदा चंद्रकांत पाटील यांचा ‘चंपा’ असा उल्लेख करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तर पाटलांच्या अनेक आरोपांना उत्तर न देता आपण त्यांना महत्व देत नसल्याचं अजित पवारांनी सुचवलं होतं. मात्र, आता जमिनी लाटण्याच्या आरोपांना अजित पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पुण्यातील आढावा बैठकीवरुनही पाटील-पवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

पुणे महापालिकेची निवडणूक जवळ येतील तसतसा चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वाद वाढताना दिसून येतोय. पुण्यातल्या शाळा आणि कोरोना आढावा बैठकीवरुनही अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. अजित पवार बैठकीत विश्वासात घेत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तर याला राष्ट्रवादीकडून पाटलांच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. अजित पवार हे विश्वासात घेत नसून बैठकीत आम्ही केलेल्या सूचनांना कचऱ्याची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे आपण बैठकीत सहभागी होत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

इतर बातम्या : 

School reopen : शनिवारी, रविवारीही शाळा सुरूच ठेवा, अजित पवारांच्या शिक्षाकांना काय सूचना?

सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीचा वाद अजून पेटणार? 11 फेब्रुवारीला महापालिकेच्या पायऱ्यांवरच सत्कार होणार!

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.