शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच?; किशोरी पेडणेकरांनी ट्विट केलेला फोटो काय सांगतो?

मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान नाकारले आहे. दोन्ही गटांनी या मैदानाची मागणी केल्याने तणावाची स्थिती आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच?; किशोरी पेडणेकरांनी ट्विट केलेला फोटो काय सांगतो?
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच?; किशोरी पेडणेकरांनी ट्विट केलेला फोटो काय सांगतो?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 1:52 PM

मुंबई: शिवसेना आणि शिंदे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेने (bmc) परवानगी नाकारली आहे. तर, दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्याची परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. आता उद्या या प्रकरणावर कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे. मात्र, महापालिकेने परवानगी नाकारली तरी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यावर शिवसेना (shiv sena) ठाम असल्याचं दिसून येतंय. शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ट्विट करून दसरा मेळाव्याबाबत सूचक विधान केलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच असल्याची चर्चा रंगली आहे.

किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. या फोटोत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गाडीच्या टपावर उभं राहून भाषण करताना दिसत आहेत. हा दसरा मेळाव्याचा फोटो आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी न मिळाल्यास अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्कातच भाषण होईल, असा सूचक इशारा किशोरी पेडणेकर या फोटोतून देत असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

या फोटोवर पेडणेकर यांनी एक पोस्ट टाकली आहे. त्यात आतुरता दसरा मेळाव्याची. पुनरावृत्ती होणारच, असं म्हटलं आहे. यातून बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने दसरा मेळाव्याला संबोधित केलं होतं, त्याच धर्तीवर उद्धव ठाकरेही शिवसैनिकांना संबोधित करतील, असंच किशोरी पेडणेकर यांना सूचवायचं असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान नाकारले आहे. दोन्ही गटांनी या मैदानाची मागणी केल्याने तणावाची स्थिती आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते, असं अहवाल पोलिसांनी महापालिकेला दिला. त्यानंतर महापालिकेने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून शिवसेनेने कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. आता या प्रकरणावर उद्या निर्णयाची अपेक्षा आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....