AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी कितीही शड्डू ठोका, बिहारमध्ये यश मिळालं म्हणून मुंबईत मिळणार नाही : किशोरी पेडणेकर

"बिहारला यश मिळालं म्हणून मुंबईत यश मिळेल असं नाही", असा टोला मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला आहे (Kishori Pednekar slams BJP on BMC election).

कोणी कितीही शड्डू ठोका, बिहारमध्ये यश मिळालं म्हणून मुंबईत मिळणार नाही : किशोरी पेडणेकर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 19, 2020 | 3:06 PM
Share

मुंबई : “मुंबईत शाखाप्रमुखांपासून इमारतीप्रमुखासोबत आमचं घट्ट नातं आहे. त्यामुळे मुंबईत कुणीही कसेही आपले शड्डू ठोकले तरी त्याच्याशी आमचं काहीही घेणंदेणं नाही. बिहारला यश मिळालं म्हणून मुंबईत यश मिळेल असं नाही”, असा टोला मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला आहे (Kishori Pednekar slams BJP on BMC election).

मुंबईत काल (18 नोव्हेंबर) भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवून भाजपने निवडणुकीचं बिगूल फुंकलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचं सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.

“आम्ही मुंबईला कधीच राजकारणाचा अड्डा बनवला नाही. मुंबई आशिया खंडातील एक नंबर शहर आहे. या मुंबईच्या सुख-दुःखात शिवसेना कायम उभी राहिलेली आहे. शिवसेनेची नाळ महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेशी अधिक दृढ झालेली आहे. हे संबंध कायम कसे जपून राहतील याकडे आमचं लक्ष असतं. आमचा लोकप्रतिनिधी ज्यादिवशी निवडून येतो, त्यादिवसापासून तो काम करत असतो. त्यामुळे आम्हाला त्याची फारशी काळजी नाही”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

“भाजपने रणशिंग फुकलंय. यातून मुंबईला रणसंग्राम करण्याचा त्यांचा उद्देश हा स्पष्ट होतोय. या रणसंग्राममध्ये आमच्या मुंबईकरांना जराही त्रास झाला तर आम्ही कदापी सहन करणार नाही. आम्ही कधीच रणशिंग किंवा रणसंग्राम मानत नाही”, असा घणाघात महापौरांनी केला.

“मुंबई हे आमचं कुटुंब आहे. आम्ही कुटुंबाप्रमाणे वागत आलो आहोत. आमच्या कुटुंबात भाजप समरस झाली होती. पण आता त्यांना वेगळे स्वप्न पडत आहेत. ठिक आहे, स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण स्वप्न भंग करायचं का ते जनता ठरवेल”, असा चिमटा किशोरी पेडणेकर यांनी काढला.

“मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार आहे असे म्हणणारे प्रभाग समितीतील फळ कशी चाकतात? हे लोक आता भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, मग तुम्ही सोबत होतात तेव्हा हे दिसलं नाही का?”, असा सवाल त्यांनी केला (Kishori Pednekar slams BJP on BMC election).

“भाजपला फक्त सत्ता हवी आहे. त्यांना मुंबईकरांचं काही भलं करायचं नाही. मुंबईत सर्व जातीधर्माच्या लोकांचा सन्मान केला जातो. बिहारला यश मिळालं म्हणून मुंबईत यश मिळेल असं नाही”, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

संबंधित बातम्या:

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर

राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान

Follow Us
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार