21 व्या वर्षी राजकारणात, विलासरावांचे वारस; कसं आहे अमित देशमुखांचं राजकारण?

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना राजकारणात येण्यासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. (know about amit vilasrao deshmukh's political career)

21 व्या वर्षी राजकारणात, विलासरावांचे वारस; कसं आहे अमित देशमुखांचं राजकारण?
जाणकारांची मते घेऊन नीट परिक्षेबाबत अंतिम निर्णय घेणार

मुंबई: राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना राजकारणात येण्यासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. त्यांचे वडील ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख दोनदा मुख्यमंत्री होते. राज्य आणि देशाच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. त्यामुळे अमित देशमुख यांच्यासाठी राजकारणाची पीच तयार असणं साहजिकच होतं. विलासरावांनी करून ठेवलेल्या या बेगमीमुळेच अमित देशमुख यांना राजकारणात मानसन्मान सर्व काही मिळालं. मतदारांनी डोक्यावर घेतलं आणि काँग्रेसमध्येही वरचं स्थान मिळालं. (know about amit vilasrao deshmukh’s political career)

कोण आहेत अमित देशमुख?

अमित देशमुख हे सध्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. पण विलासरावांचे पूत्र, विलासरावांचे वारस म्हणूनच त्यांची मोठी ओळख आहे. अलिकडेच त्यांनी बंधू धीरजसाठी लातूर ग्रामीणची सीट फिक्स केल्याचा आरोप भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. त्यावेळी अमित देशमुख चर्चेत आले होते. विलासरावांच्यानंतर लातूरचे आमदार म्हणून अमित देशमुखच प्रतिनिधीत्व करत आहेत. काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राहुल गांधींच्या गटातले म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.

21 व्या वर्षी राजकारणात

अमित देशमुख यांचा जन्म 21 मार्च 1976 रोजी झाला. त्यांनी बीई (केमिकल) पदवी घेतली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. वयाच्या 21 वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1997मध्ये लातूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात भाग घेतला. त्याच वर्षी त्यांनी युवक काँग्रेसमधून कार्यास सुरुवात केली. 1999 मध्ये ते काँग्रेस नेते शिवराज पाटील यांच्या निवडणूक प्रचारातही त्यांनी भाग घेतला होता.

वडिलांसारखी शैली

अमित देशमुख यांच्यावर विलासराव देशमुख यांचा प्रचंड प्रभाव आहे. विलासरावांसारखं दिसणं, त्यांच्या सारखा आवाज, त्यांच्या सारखीच कार्यशैली आणि अभ्यासूपणा यामुळे त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रभाव पाडला. त्यामुळे त्यांना युवक काँग्रेसचं उपाध्यक्षपद मिळालं. 2002 ते 2008पर्यंत त्यांनी युवक काँग्रेसचं उपायध्यक्षपद सांभाळलं.

पहिली निवडणूक, सहज विजय

2009मध्ये अमित देशमुख यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. विलासराव देशमुखांचं लातूरमध्ये वर्चस्व असल्यामुळे ते लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सहज विजयी झाले. तब्बल 89, 480 मतांनी त्यांचा विजय झाला. त्यांनी बसपाचे उमेदवार डॉ. खय्युम खान यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. 2009नंतर विजयाची हॅट्रीक साधण्यात ते यशस्वी झाले.

विजयाची हॅट्रीक

2009मध्ये तब्बल 90 हजार मतांनी विजय मिळवल्यानंतर 2014नंतर त्यांनी 49 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर 2019च्या निवडणुकीत त्यांनी 40 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, प्रत्येक निवडणुकीत त्यांचं मताधिक्य घटत गेल्याचं दिसून येत आहे. 2019ची निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. 2014च्या निवडणुकीत विलासरावांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट होती. परंतु 2019ची निवडणूक ही सर्वस्वी त्यांना सिद्ध करायला लावणारी होती. त्यातच त्यांचे बंधू धीरज देशमुखही निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे भावाचा प्रचार करतानाच आपला मतदारसंघ पिंजून काढण्याची दुहेरी जबाबदारी त्यांना पार पाडावी लागली. त्यातच त्यांना त्यांचे बंधू आणि अभिनेते रितेश देशमुख यांची साथ मिळाल्याने अमित देशमुख यांचा विजय सोपा झाला.

दुसऱ्यांदा मंत्रिपद

विलासराव देशमुख यांचं 2012 मध्ये निधन झालं. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये अमित देशमुख यांचा लगेच समावेश होणार असल्याची चर्चा होती. परंतु, त्यांना 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी मंत्रिपद दिलं. त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क आणि पर्यटन खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्याने काँग्रेसला पाच वर्षे विरोधी बाकावर बसावं लागलं. त्यानंतर 2019मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि देशमुख यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. त्यांना वैद्यकीय शिक्षण खात्याचा भार देण्यात आला. (know about amit vilasrao deshmukh’s political career)

सहकार क्षेत्रावर वर्चस्व

अमित देशमुख यांनी राजकारणासह सहकार क्षेत्रातही आपला दबदबा कायम ठेवला आहे. मांजरा, विकास आणि रेणा साखर कारखान्यावर त्यांचं वर्चस्व कायम आहे. लातूरमधील शिक्षण, सहकार क्षेत्रात अमित देशमुख यांनी मोठं काम केलं आहे. त्यांचा लोकसंपर्कही दांडगा आहे. त्यामुळेच लातूरमधून निवडून येण्याची किमया ते साधत असतात. (know about amit vilasrao deshmukh’s political career)

 

संबंधित बातम्या:

प्रवाहाविरुद्ध राजकारण, प्रस्थापितांना घरी बसवलं; वाचा, दादा भुसेंची ‘राज’नीती

नवी मुंबईचे ‘गॉड’, शिवसेना, राष्ट्रवादी ते भाजप…; कसा आहे गणेश नाईकांचा राजकीय प्रवास?, वाचा!

‘भोळ्या शंकरा’, ‘पाणीदार आमदार’; जाणून घ्या, कोण आहेत शंकरराव गडाख?

(know about amit vilasrao deshmukh’s political career)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI