चौथ्यांदा आमदार, हत्येचाही आरोप; वाचा, कोण आहेत किसन कथोरे?

विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आलेले आमदार किसन कथोरे यांची राजकीय कारकिर्द वादळी आणि तितकीच वादग्रस्त ठरली आहे. (know about bjp's controversial leader kisan kathore)

चौथ्यांदा आमदार, हत्येचाही आरोप; वाचा, कोण आहेत किसन कथोरे?
kisan kathore
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 4:34 PM

मुंबई: विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आलेले आमदार किसन कथोरे यांची राजकीय कारकिर्द वादळी आणि तितकीच वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. एवढेच नव्हे तर हत्येचा आरोपही त्यांच्यावर झाला. सध्या कथोरे हे भाजपमध्ये आहेत. त्यांच्या या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला आढावा. (know about bjp’s controversial leader kisan kathore)

सरपंचपदापासून सुरुवात

कथोरे हे 1978 ते 1992 पर्यंत अंबरनाथ येथील सागावचे सरपंच होते. 1982 पासून ते सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते. विविध योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल राज्य शासनाचा प्रथम पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीवर ते सदस्य म्हणून होते. नंतर पंचायत समितीचे सभापती होते. आरोग्य व बांधकाम समितीचेही ते सभापती होते.

केरळकडून दखल

कथोरे यांनी पाटी दप्तर विना शाळा हा उपक्रम राबविला होता. त्यांचा हा उपक्रम राज्यात गाजला होता. त्याची दखल केरळने घेऊन त्यांनी हा उपक्रम राबवला होता. नवी मुंबई ते बदलापूर बससेवा त्यांनीच सुरू केली होती. आदिवासींना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी जिजाऊ विक्री केंद्र सुरू केलं. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनाचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये

कथोरे हे 2014मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले होते. ते मुरबाडचे आमदार आहेत. भाजपच्या तिकिटावर ते 2014 आणि 2019मध्ये निवडून आले आहेत. ते 2004मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर अंबरनाथमधून निवडून आले होते. 2009मध्येही ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर मुरबाड मतदारसंघातून ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

2019मध्ये महाविकास आघाडीवर आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ते काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या विरोधात उभे होते. भाजपने त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे केले होते. 2019 लाही ते मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गोटीराम पवार उभे होते. यावेळी गोटीराम पवार यांचा त्यांनी 26 हजार 230 मतांनी पराभव केला होता.

पुरस्कार

त्यांना वसंतराव नाईक स्मृती राज्य पुरस्कार, शिक्षक मित्र, समाज भूषण, आदिवासी मित्र आणि ठाणे जिल्हा भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नेपाळ, स्वित्झर्लंड, यूरोप, सिंगापूर, थायलँड आणि मलेशिया या देशांचा त्यांनी दौरा केला आहे.

शेतकी सोसायटीने वादात

कथोरे हे शेतकी सोसायटीमुळे वादात सापडले होते. बनावट कागदपत्रं तयार करून त्यांनी सागाव येथील ही सोसायटी स्थापन केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी उल्हासनगर न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले होते. विविध सदस्यांची नावे टाकून आणि खोट्या स्वाक्षऱ्या करून ही सोसायटी स्थापन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

यादीत सनदी अधिकाऱ्याचे नाव

या शेतकी सोसायटीत ज्या ज्या लोकांची नाव टाकण्यात आली होती, त्यात आर. ए. राजीव या सनदी अधिकाऱ्याचंही नाव टाकण्यात आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत शिवसेनेचे प्रभु पाटील यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मागवून ही धक्कादायक माहिती उजेडात आणली होती.

खुनाचा गुन्हा

2014मध्ये बदलापूरचे शिवसेना उपशाखा प्रमुख मोहन राऊत यांचा खून झाला होता. याप्रकरणी कथोरे यांच्यासह सहा जणांवर हत्येचा आरोप करण्यात आला होता.

इतर आरोप

त्यांच्यावर 2004च्या विधानसभा निवडणुकीत खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर भादंवि कलम 177 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने 2007मध्ये कथोरे यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (know about bjp’s controversial leader kisan kathore)

संबंधित बातम्या:

दहशत आणि विकास… हितेंद्र ठाकूर राजकारणात कसे आले? वाचा सविस्तर

108 वर्षांपूर्वी पूर्वज आले अन् मुंबईकर झाले, तीनदा बेस्ट आमदार; कोण आहेत योगेश सागर?

बिगारी कामगार ते विधानसभेचे उपाध्यक्ष; जाणून घ्या नरहरी झिरवाळांबद्दल!

(know about bjp’s controversial leader kisan kathore)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.