दहशत आणि विकास… हितेंद्र ठाकूर राजकारणात कसे आले? वाचा सविस्तर

बहुजन विकास आघाडीचे नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. (who is hitendra thakur?, know about everything him)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:04 PM, 4 May 2021
दहशत आणि विकास... हितेंद्र ठाकूर राजकारणात कसे आले? वाचा सविस्तर
Hitendra Thakur

मुंबई: बहुजन विकास आघाडीचे नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांचे बंधू भाई ठाकूर यांची दहशत… बहुजन विकास आघाडीचं वसई ते विरार पट्ट्यातील वर्चस्व… अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं… हितेंद्र ठाकूर यांची उदारता, वाद आणि गुन्हे या कारणांमुळे ते सतत चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याशी संबंधित विवा ग्रुप कंपनीवर ईडीच्या धाडी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच चर्चेत आले. कोण आहेत हितेंद्र ठाकूर? राजकारणात त्यांचा प्रवास कसा झाला? यावर टाकलेला हा प्रकाश. (who is hitendra thakur?, know about everything him)

कोण आहेत हितेंद्र ठाकूर?

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले हितेंद्र ठाकरू वसई, विरार आणि पालघरमधील बडे नेते आहेत. त्यांचा या भागात दबदबा आहे. हितेंद्र ठाकूर यांचं शिक्षण विरार येथे झालं. त्यानंतर ते वर्तक महाविद्यालयातून पदवीधर झाले. वर्तक महाविद्यालयात शिकत असतानाच कॉलेजच्या स्टुडंट कौन्सिलवर जनरल सेक्रेटरी म्हणून ते विजयी झाले. त्यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर हे नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून 2009ला विजयी झाले. त्यांची पत्नी प्रविणा ठाकूर या वसई-विरार महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर आहेत. हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात हितेंद्र ठाकूर यांनी शाळा आणि महाविद्यालयांचं जाळं निर्माण केलं आहे. ते दरवर्षी वसई कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करत असतात. तसेच साहित्य संमेलन, किर्तन महोत्सव आणि नाट्य संमेलन भरवण्यातही त्यांचा मोठा सहभाग असतो. ते हितेंद्र यंग स्टार ट्रस्टचेही अध्यक्ष आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक जीम सुरू केल्या आहेत.

भाई ठाकूर यांची दहशत

वसई-विरार पट्ट्यात जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर यांची मोठी दहशत होती. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना राजकारणात उभं राहता आलं. मात्र, पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. त्यामुळे त्यांना त्यांचा मतदारसंघ कायम राखता आला. एवढेच नव्हे तर विकासकामांच्या माध्यमातून वसई-विरार पट्ट्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवरही त्यांनी राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं.

1988 मध्ये राजकारणात

ते 1988 पासून राजकारणात आहेत. मात्र 1990च्या सुमारास हितेंद्र ठाकूर यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. ते युवक काँग्रेसचे तालुका प्रमुख बनले होते. त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन नेते शरद पवार यांनी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच तिकीट देण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना विदानसभेची उमेदवारी मिळाली होती. विशेष म्हणजे ठाकूर यांची उमेदवारी जाहीर होताच वसई विरारमध्ये दिवाळी साजरी झाली होती. वयाच्या 29व्या वर्षीच ते आमदार झाले होते. वसई मतदारसंघ हा जनता दलाचा बालेकिल्ला होता. मात्र, हितेंद्र ठाकूर यांचा राजकीय उदय झाला आणि दोन तीन वर्षात त्यांनी जनता दलाचा बालेकिल्ला पोखरून काढला होता.

बहुजन विकास आघाडीची स्थापना

पुढे हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसमधून बाहरे पडून 2017मध्ये बहुजन विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीच्या माध्यमातून ते तीनदा निवडून आले. त्यानंतर त्यांनी 2009 आणि 2014मध्ये मुलाला संधी देण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. 2019 मध्ये त्यांनी मी राजकारणातून बाहेर पडणार नाही, पण यापुढे एकही निवडणूक लढणार नाही, असं जाहीर केलं आहे. बहुजन विकास आघाडीचे वसई-विरार महापालिका, वसई तालुका पंचायत समितीत वर्चस्व आहे.

बांधकाम व्यवसायात प्रवेश

राजकारणात स्थिर झाल्यावर ठाकूर यांनी बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी वसई-विरार पट्ट्यात शेकडो बांधकामे केली. त्यांची काही अनधिकृत बांधकामे तोडण्याचे कोर्टाने आदेशही दिले होते. ठाकूर यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थाही मोठ्या प्रमाणवार उभारल्या आहेत. ठाकूर यांनी बिल गेट्स सारख्या धनाढ्य व्यक्तिला विरारमध्ये आणले. एवढेच नव्हे तर अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनाही विरारमध्ये आणले होते.

वाद

3 जुलै 2009मध्ये महाराष्ट्र सरकारने एक नोटीफिकेशन्स जारी केलं होतं. 53 गावांचा वसई-विरार महापालिकेत समावेश करणअयासाठी हे नोटीफिकेशन्स काढण्यात आलं होतं. त्याला 53 पैकी 49 गावांनी विरोध केला होता. पर्यावरण आणि ऐतिहासिक वास्तूंचा हवाला देत या विलनिकरणाला विरोध केला होता. ठाकूर यांचे राजकीय विरोधक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गाव बचाव समिती स्थापन करून सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता. यावेळी पंडित यांना अटक झाली होती आणि मारहाणही झाली होती. त्याचा आरोप ठाकूर यांच्यावर करण्या आला होता.

बाईकवरून वादात

वसई आरटीओमध्ये इंडियन कंपनीची एक बाईक रजिस्ट्रेशनसाठी आली होती. या बाईकवरून ठाकूर यांच्यावर टीका झाली होती. ठाकूर यांनी ही बाईक मुलगा उतंग ठाकूर यांना घेतल्याचं सांगितलं जात होतं. इंडियन शेफ क्लासिक नावाची ही क्रुझर बाईक अमेरिकन ब्रँडची आहे. या बाईकची किंमत 23 लाख रुपये होती. या बाईकचे फोटो अनेकांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे ठाकूर यांनी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. (who is hitendra thakur?, know about everything him)

ईडीच्या धाडी

ठाकूर यांच्याशी संबंधित विवा ग्रुपच्या कार्यालयावर ईडीने छापे मारले होते. यावेळी त्यांनी मी आणि आमदार क्षितीज ठाकूर विवा ग्रुपचा भाग नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यांचे चुलत भाऊ दीपक ठाकूर आणि इतर या ग्रुपचं काम पाहत असल्याचं स्पष्ट झालं होतं. या धाडीनंतर ठाकूर यांनी उपरोधिक टोला लगावला होता. माझ्या कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने आता मीही मोठा झालो आहे, असा उपरोधात्मक टोलाही हितेंद्र ठाकूर यांनी लगावला होता. (who is hitendra thakur?, know about everything him)

 

संबंधित बातम्या:

108 वर्षांपूर्वी पूर्वज आले अन् मुंबईकर झाले, तीनदा बेस्ट आमदार; कोण आहेत योगेश सागर?

बिगारी कामगार ते विधानसभेचे उपाध्यक्ष; जाणून घ्या नरहरी झिरवाळांबद्दल!

कट्टर काँग्रेसी, थेट उद्वव ठाकरेंना उपोषणाचा इशारा; वाचा, कोण आहेत कैलास गोरंट्याल?

(who is hitendra thakur?, know about everything him)