कट्टर काँग्रेसी, थेट उद्वव ठाकरेंना उपोषणाचा इशारा; वाचा, कोण आहेत कैलास गोरंट्याल?

जालन्यातील काँग्रेसचे बडे नेते आणि कट्टर काँग्रेसी म्हणून आमदार कैलास गोरंट्याल यांची ओळख आहे. (know everything about congress leader kailash gorantyal)

कट्टर काँग्रेसी, थेट उद्वव ठाकरेंना उपोषणाचा इशारा; वाचा, कोण आहेत कैलास गोरंट्याल?
kailash gorantyal

मुंबई: जालन्यातील काँग्रेसचे बडे नेते आणि कट्टर काँग्रेसी म्हणून आमदार कैलास गोरंट्याल यांची ओळख आहे. तीन वेळा आमदार राहिलेल्या गोरंट्याल यांना ठाकरे मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता होती. परंतु, त्यांची वर्णी लागली नाही. त्यामुळे ते काँग्रेसच्या नेत्यांवर नाराजही झाले होते. तशी नाराजीही त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. कोण आहेत कैलास गोरंट्याल? कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास, त्यावर टाकलेला हा प्रकाश. (know everything about congress leader kailash gorantyal)

पदाचा राजीनामा

पक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करत असून आपल्याला न्याय देत नसल्याचं सांगून गोरंट्याल यांनी पदाचा राजीनामा दिला होता. आपल्याला मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र मंत्रिपद दिलं नाही. आपण तीन वेळा निवडून आलो आहोत. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. तरीही आपल्यावर अन्याय करण्यात आल्याची नाराजी गोरंट्याल यांनी बोलून दाखवली होती.

कट्टर काँग्रेसी

गोरंट्याल यांची राजकीय कारकिर्द नगरसेवकपदापासून झाली. त्यानंतर ते विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. जालन्यात काँग्रेस मजबूत करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. ते जालन्यातील काँग्रेसचे एकमेव बडे नेते असून त्यांचा प्रचंड लोक संपर्क आहे. त्यांचं अख्खं कुटुंब काँग्रेसमध्येच आहे. गोरंट्याल हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अत्यंत जवळचे होते. ते अशोक चव्हाण यांचेही निकटवर्तीय मानले जातात. विडी उत्पादक आणि हॉटेल व्यावसायिक म्हणूनही गोरंट्याल कुटुंब ओळखलं जातं. गोरंट्याल यांच्या पत्नी संगिता गोरंट्याल या जालना नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा होत्या. त्यांनी नगरपरिषदेवर काँग्रेसचे 28 नगरसेवक निवडून आणले होते.

खोतकरांना पाडलं

2014च्या निवडणुकीत गोरंट्याल यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, 2019च्या निवडणुकीत त्यांनी जालना मतदारसंघातून शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना पराभूत केलं होतं. 2019ची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली होती. या निवडणुकीत त्यांच्यासाठी कोणत्याही काँग्रेसच्या बड्या नेत्याने सभा घेतली नव्हती. तरीही ते 26 हजार मताधिक्यांनी विजयी झाले होते. खोतकर हे मंत्री असल्याने ते निवडून येतील असं बोललं जात होतं. मात्र, गोरंट्याल यांनी खोतकरांना पराभूत केलं. जालन्यात खोतकर आणि गोरंट्याल यांच्यात नेहमीच अटीतटीची लढत होत असते.

आमदारकी रद्द झाली

अर्जुन खोतकर हे 2014मध्ये राज्यमंत्री असताना त्यांनी उशिराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे गोरंट्याल यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली होती. कोर्टाने या प्रकरणाच्या दोन्ही बाजू ऐकून घेऊन खोतकर यांची उमेदवारी रद्द केली होती.

उपोषणाचा इशारा

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नगरविकास खात्याकडून होत असलेल्या निधी वाटपाच्या मुद्द्यावरून गोरंट्याल नाराज झाले होते. समान निधी वाटप झाला नाही तर 11 आमदारांसह उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला होता. जालन्यातील चार नगरपालिकांसाठी नगर विकास खात्याकडून 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याचा शासन निर्णय काढण्यात आला. पण काही दिवसांतच हा निधी रद्द करण्यात आला होता. जालन्यात चार पैकी तीन नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. ज्या नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, जिथे काँग्रेसचे आमदार आहेत, तिथेच त्यांना निधी देण्यापासून डावललं जात आहे, असा जाहीर आरोप करत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. (know everything about congress leader kailash gorantyal)

 

संबंधित बातम्या:

काँग्रेसच्या गडात कमळ फुलवले; वाचा कोण आहेत काशीराम पावरा?

विद्यार्थीदशेत ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठात विजयी, चारवेळा आमदार; वाचा, कोण आहेत जयकुमार रावल?

युवा नेता ते राज्यमंत्री… वाचा, डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास

(know everything about congress leader kailash gorantyal)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI