AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूरकरांनी जे ठरवलं, तेच केलं, सेनेचे दोन खासदार निवडले, सर्व आमदार पाडले!

राज्यापेक्षा नेहमीच वेगळा निकाल देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याने यंदाही ठरवल्याप्रमाणेच केलेलं दिसतंय. कारण लोकसभेला आमचं ठरलंय म्हणत, शिवसेनेला दोन खासदार देणाऱ्या कोल्हापूरकरांनी (Kolhapur assembly results 2019) जिल्ह्यातील सेनेचे जवळपास सर्व आमदार पाडल्याचं चित्र आहे.

कोल्हापूरकरांनी जे ठरवलं, तेच केलं, सेनेचे दोन खासदार निवडले, सर्व आमदार पाडले!
| Updated on: Oct 24, 2019 | 3:04 PM
Share

Kolhapur assembly results 2019 कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी आश्चर्यकारक तर बहुतेक ठिकाणी एक्झिट पोलमध्ये प्रतिबिंबित केलेले निकाल पाहायला मिळाले. राज्यापेक्षा नेहमीच वेगळा निकाल देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याने यंदाही ठरवल्याप्रमाणेच केलेलं दिसतंय. कारण लोकसभेला आमचं ठरलंय म्हणत, शिवसेनेला दोन खासदार देणाऱ्या कोल्हापूरकरांनी (Kolhapur assembly results 2019) जिल्ह्यातील सेनेचे जवळपास सर्व आमदार पाडल्याचं चित्र आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. दोन्हीही जागा यंदा शिवसेनेने जिंकल्या. तर कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये त्यापैकी 6 शिवसेनेकडे, 2 भाजपकडे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. म्हणजे मोदींनी घोषणा केल्याप्रमाणं कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसमुक्त झाला. कोल्हापूर महापालिका सोडली तर सर्वच ठिकाणी शिवसेना-भाजपनं सत्ता स्थापन केली.

मात्र कोल्हापूर जिल्ह्याची धुरा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आपल्या हाती घेतली आणि यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्याचं चित्र पालटलं. शिवसेनेचे 6 पैकी 5 आमदार हरले आहेत. राधानगरीतील प्रकाश आबिटकर हे एकमेव आमदार टफ फाईट देत होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील लढत झाली. यात आबिटकर यांनी बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेच्या 6 पैकी केवळ एकच आमदार आपली जागा वाचवू शकला.

2014 मध्ये शिवसेनेकडून निवडून आलेल्यांमध्ये कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, हातकणंगलेतून सुजीत मिणचेकर, शाहूवाडीतून सत्यजीत पाटील सरुडकर, शिरोळमधून उल्हास पाटील आणि करवीरमधून चंद्रदीप नरके या विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे.

कोल्हापूर उत्तर काँग्रेसचे चंद्रकांत जाधव, हातकणंगलेतून काँग्रेसचे राजीव आवळे, शिरोळमध्ये राजेंद्र यड्रावकर अपक्ष, शाहूवाडीत जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे आणि करवीरमध्ये काँग्रेसचे पी एन पाटील यांचा विजय झाला.

कोल्हापुरातील विजयी उमेदवार

  1. इचलकरंजी –  प्रकाश आवडे, अपक्ष उमेदवार, भाजपचे सुरेश हाळवणकर पराभूत
  2. कोल्हापूर दक्षिण – विजयी ऋतुराज पाटील- काँग्रेस, भाजपचे अमल महाडिक पराभूत
  3. कोल्हापूर उत्तर – विजयी चंद्रकांत जाधव – काँग्रेस, शिवसेनेचे राजेश क्षीरसागर पराभूत
  4. राधानगरी-भुदरगड – विजयी प्रकाश आबिटकर, शिवसेना, राष्ट्रवादीचे के पी पाटील पराभूत
  5. शाहूवाडी – विजयी विनय कोरे, जनसुराज्य पक्ष,  शिवसेनेचे सत्यजित आबा पाटील पराभूत
  6. करवीर – पी एन पाटील, विजयी,  काँग्रेस, चंद्रदीप नरके पराभूत, शिवसेना
  7. हातकणंगले- राजू आवळे, विजयी  काँग्रेस. शिवसेनेचे सुजित मिणचेकर, पराभूत
  8. शिरोळ – राजेंद्र पाटील- यड्रावकर, विजयी, अपक्ष, उल्हास पाटील, शिवसेना आमदार पराभूत
  9. चंदगड –
  10. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी- कागल विजयी, संजय घाटगे पराभूत
विधानसभा मतदारसंघमहायुती महाआघाडीअपक्ष/इतरविजयी उमेदवार
कागल विधानसभा संजयबाबा घाटगे (शिवसेना)हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)समरजित घाटगे(अपक्ष) भाजपचे, बंडखोरहसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
चंदगड विधानसभा संग्राम कुपेकर (शिवसेना)राजेश पाटील (राष्ट्रवादी) शिवाजी पाटील(अपक्ष) भाजपचे, बंडखोरराजेश पाटील (राष्ट्रवादी)
शिरोळ विधानसभाउल्हास पाटील,(शिवसेना)सावकार मदनाईक,(स्वाभिमानी शेतकरी संघटना)राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष) राष्ट्रवादीचे बंडखोरराजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष)
करवीर विधानसभाचंद्रदीप नरके (शिवसेना)पी एन पाटील (काँग्रेस)पी एन पाटील (काँग्रेस)
राधानगरी विधानसभाप्रकाश आबीटकर (शिवसेना)के पी पाटील (राष्ट्रवादीराहुल देसाई (अपक्ष)भाजप बंडखोरप्रकाश आबीटकर (शिवसेना)
शाहूवाडी विधानसभासत्यजित पाटील (शिवसेना)विनय कोरे(जनसुराज्य)विनय कोरे (जनसुराज्य)
हातकणंगले विधानसभा सुजित मिणचेकर (शिवसेना)राजू जयवंत आवळे (काँग्रेस)अशोकराव माने राजू जयवंत आवळे (काँग्रेस)
इचलकरंजी विधानसभासुरेश हळवणकर(भाजप)राहुल खंजिरे (काँग्रेस)प्रकाश आवाडे (अपक्ष)प्रकाश आवाडे (अपक्ष)
कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक (भाजप)ऋतुराज पाटील (काँग्रेस)ऋतुराज पाटील (काँग्रेस)
कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागर (शिवसेना)चंद्रकांत जाधव (काँग्रेस)चंद्रकांत जाधव (काँग्रेस)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.