शिवसेना खासदार संजय मंडलिकांना कोरोनाची बाधा, कुटुंबातील दोघांना लागण

कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली (Kolhapur Shivsena MP Sanjay Mandlik Corona Positive) आहे.

शिवसेना खासदार संजय मंडलिकांना कोरोनाची बाधा, कुटुंबातील दोघांना लागण
Namrata Patil

|

Aug 25, 2020 | 9:48 AM

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. संजय मंडलिक यांच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. यापूर्वी कोल्हापुरातील तीन आमदारांना कोरोनाची बाधा झाली होती. (Kolhapur Shivsena MP Sanjay Mandlik Corona Positive)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यासह दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा

दरम्यान काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शुक्रवारी (21 ऑगस्ट) ऋतुराज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रविवारी (23 ऑगस्ट) कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली होती. या दोघांवरही जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव अशा 3 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता खासदार संजय मंडलिक यांनाही कोरोना झाला आहे. तर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यत पोहचल्याने चिंता वाढली आहे. (Kolhapur Shivsena MP Sanjay Mandlik Corona Positive)

संबंधित बातम्या : 

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण

कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा, आधी ऋतुराज पाटील, आता आणखी एका काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें