AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर ZP अध्यक्षपदासाठी काँग्रेस आमदाराच्या मुलाचे नाव, राष्ट्रवादीच्या युवराज पाटलांच्या समर्थकांचा रास्तारोको

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी निवड झालेले राहुल पाटील हे काँग्रेस आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र आहेत. करवीर मतदारसंघातून पी एन पाटील विधानसभेवर आमदार आहेत

कोल्हापूर ZP अध्यक्षपदासाठी काँग्रेस आमदाराच्या मुलाचे नाव, राष्ट्रवादीच्या युवराज पाटलांच्या समर्थकांचा रास्तारोको
Kolhapur Congress MLA PN Patil Sadolikar
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 3:30 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी काँग्रेस आमदाराच्या मुलाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आमदार पी एन पाटील (P N Patil Sadolikar) यांचे सुपुत्र राहुल पाटील (Rahul Patil) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तर कोल्हापूर झेडपी उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या जयवंतराव शिंपी यांचे नाव ठरले आहे. मात्र अध्यक्षपदासाठी (Kolhapur ZP President Election) काँग्रेसला उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांनी राहुल पाटील आणि जयवंतराव शिंपी या दोघांच्या नावांची घोषणा केली. इतर पदाधिकाऱ्यांची नावे उद्या जाहीर केली जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी दुपारी निवड प्रक्रिया होणार आहे.

‘त्या’वेळी पीएन पाटील समर्थक नाराज होते

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी निवड झालेले राहुल पाटील हे काँग्रेस आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र आहेत. करवीर मतदारसंघातून पी एन पाटील विधानसभेवर आमदार आहेत. याआधी, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोल्हापुरातून काँग्रेसने सतेज पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे पी एन पाटील समर्थक नाराज झाले होते.

कोण आहेत पी एन पाटील?

  • पी एन पाटील हे काँग्रेसचे विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत.
  • कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांचा पराभव केला.
  • पी एन पाटील यांचा 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत पराभव झाला होता.
  • पी एन पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद भूषवलं होतं.

महाविकास आघाडीचा विजय निश्चित

महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातो. भाजप आणि मित्रपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. संख्याबळ नसल्याने विरोधकांनी निवडी बिनविरोध पार पाडाव्यात, असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं होतं.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचे तीव्र पडसाद कागल तालुक्यात उमटल्याचे पाहायला मिळाले. ऐनवेळी अध्यक्षपदाची संधी हुकल्याने युवराज पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी कसबा सांगाव भागात रास्ता रोको आंदोलन केलं.

युवराज पाटलांच्या समर्थकांचा हिरमोड

कसबा सांगाव हा युवराज पाटील यांचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीचे युवराज पाटील हे अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र ऐनवेळी पद काँग्रेसकडे गेल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. कोरोना हॉटस्पॉट असलेल्या कसबा सांगावमध्ये कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा नडला, कारण पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यातून हटवलं.

संबंधित बातम्या  

‘एकनिष्ठतेपेक्षा पैशांचं वजन अधिक’, कोल्हापुरात फोटो व्हायरल; पी एन पाटील गट नाराज 

मंत्रिपद न दिल्याने नाराज, काँग्रेस आमदार पी एन पाटील राजीनामा देण्याची शक्यता

(Kolhapur ZP President Election Congress MLA PN Patil Son Rahul Patil gets ticket)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.