ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, त्यानंतर भाजप सत्तेवर येणार, नगरच्या ‘किंगमेकर’चा दावा

काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसशासित नगरपालिकांना निधी देत नसल्याची खंत बोलून दाखविली होती. | Maha Vikas Aghadi govt

ठाकरे सरकार डिसेंबरपर्यंतच राहणार, त्यानंतर भाजप सत्तेवर येणार, नगरच्या 'किंगमेकर'चा दावा
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 8:48 PM

अहमदनगर: राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार येत्या डिसेंबर महिन्यापर्यंतच टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा दावा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. शिवाजी कार्डिले हे नगर जिल्ह्यातील सामर्थ्यशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहेत. (BJP leader Shivaji Kardile claims Maha Vikas Aghadi govt will collapse in December)

काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसशासित नगरपालिकांना निधी देत नसल्याची खंत बोलून दाखविली होती. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास कसे उत्सुक नव्हते, या आठवणीलाही त्यांनी उजाळा दिला होता. त्यामुळे महाविकासआघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले होते. परिणामी आता शिवाजी कार्डिले यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाविकासआघाडीचे सरकार पुढची पाच वर्षे सोडा, किती काळ टिकेल, हे आता जनताच सांगेल. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. पण महाविकासआघाडीचे सरकार फार तर डिसेंबर महिन्यापर्यंत टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असे भाकीत कार्डिले यांनी वर्तविले. त्यांच्या या वक्तव्याच्या आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल. मला भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षात जायचे नाही. मला कोणीही संपर्क केला नाही आणि मला त्याची गरजही नाही, अशी पुस्तीही यावेळी शिवाजी कार्डिले यांनी जोडली.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही; कर्डिलेंची स्पष्टोक्ती एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशानंतर कर्डीले यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा नगर जिल्ह्यात सुरू आहे. यावर शिवाजी कर्डिले यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचं नाही. तसेच माझ्याकडे कोणी संपर्क केला नाही आणि त्याची मला गरज नाही.

एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना माझ्यावर एक संकट आले होते. मला एका खोट्या गुन्हा मध्ये अडकवले होते. तेव्हा अन्यायाच्या विरोधात न्याय देण्याची भूमिका बजावण्यासाठी ते नगरमध्ये आले होते. त्यामुळेच त्यांचे आणि माझे जवळचे संबंध असल्यामुळे लोक तशी चर्चा करीत असतील. मात्र, ज्यावेळी ते राष्ट्रवादीत गेले त्यावेळी हा विषय संपला. मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचे नाही, असे कर्डिले यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

राज्यातील मविआ सरकार पाच वर्षे पूर्ण टिकणार- प्राजक्त तनपुरे

शरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल : रोहित पवार

(BJP leader Shivaji Kardile claims Maha Vikas Aghadi govt will collapse in December)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.