AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde | शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातल्या मंत्र्यांचा शपथविधी, बंडखोरांपैकी कुणाची संधी हुकली?

शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असून त्यात अगदी अपेक्षित अशी काही नावं मागे ठेवण्यात आली आहेत. यामागील कारणांवर आता चर्चा होऊ लागली आहे.

CM Eknath Shinde | शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातल्या मंत्र्यांचा शपथविधी, बंडखोरांपैकी कुणाची संधी हुकली?
संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक Image Credit source: social media
| Updated on: Aug 09, 2022 | 1:06 PM
Share

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बहु प्रलंबित मंत्रिमंडळ विस्ताराला आज अखेर मुहूर्त लागला. भाजपचे 9 आणि एकनाथ शिंदे गटाचे 9 अशा एकूण 18 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा शपथविधी होऊन 39 दिवस उलटल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. दरम्यानच्या काळात शिंदे गटातील आमदारांनी (Shivsena MLA) अनेकदा मुंबई वाऱ्या केल्या. एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले. त्यामुळे असे शक्तिप्रदर्शन करणाऱ्या कुणा-कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असून त्यात अगदी अपेक्षित अशी काही नावं मागे ठेवण्यात आली आहेत. ही यादी पुढीलप्रमाणे सांगता येईल.

  1. संजय शिरसाट- औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. मराठवाड्यातील बंडखोरीत त्यांची मोठी भूमिका असल्याचे सांगितले जात होते. मात्र पहिल्या टप्प्यात तरी त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.
  2. भरत गोगावले- महाडचे आमदार भरत गोगावले यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. एकनाथ शिंदे गटातील मुख्य प्रतोद अशी जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
  3.  प्रताप सरनाईक- ओवळा-माळीवाडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक हेदेखील शिवसेनेतील एक बड प्रस्थ आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळण्याची अपेक्षा होती. मात्र पहिल्या टप्प्यात त्यांची संधी हुकलेली दिसतेय.
  4. सुहास कांदे- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे हेदेखील उत्तर महाराष्ट्रातील आक्रमक नाव आहे. भाजप आणि शिंदे सरकारच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने सुहास कांदे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. मात्र पहिल्या टप्प्यात त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलेलं नाही.
  5.  संतोष बांगर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बहुमत चाचणीला ऐनवेळी हजेरी लावणाऱ्या हिंगोलीच्या आमदार संतोष बांगर यांनी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर हिंगोली ते मुंबई अशी शेकडो शिवसैनिकांची रॅली घेऊन ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कारासाठी पोहोचले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा होती.
  6.  लता सोनवणे- जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे आणि भायखळा मतदार संघाच्या यामिनी जाधव यांच्याकडे संभाव्य मंत्रिमंडळातील महिला चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. मात्र सध्या तरी या स्पर्धेत त्यांचं नाव मागे पडल्याचं चित्र आहे.

औरंगाबादच्या वाट्याला तीन मंत्रिपदं

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याला यंदाच्या मंत्रिमंडळात तीन मंत्रिपदं देण्यात आली आहेत. पैठणचे आमदार संदिपान भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि औरंगाबाद मध्य मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांचा राजभवनात शपथविधी पार पडला. सध्या केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे ही मंत्रिपदंही औरंगाबादला मिळालेली आहेत. जालन्याचे असले तरीही रावसाहेब दानवेंना औरंगाबादच्या अगदी जवळ असल्याने मराठवाड्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे-भाजप सरकारने अत्यंत नियोजनपूर्वक मंत्रिपदे दिल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.