AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुका कधी होणार?, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; फडणवीस म्हणतात, परमेश्वरालाच…

एकनाथ शिंदे यांनी येत्या जानेवारीत महापालिका निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे जानेवारीत महापालिका निवडणुकीचं बिगूल फुंकलं जाणार असल्याच्या ब्रेकिंग बातम्याही झाल्या.

महापालिका निवडणुका कधी होणार?, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; फडणवीस म्हणतात, परमेश्वरालाच...
महापालिका निवडणुका कधी होणार?, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलंImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2022 | 10:55 AM
Share

मुंबई: कोरोनाचं संकट ओसरलेलं आहे. त्याशिवाय पावसाळाही संपलेला आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुका (bmc) कधी होणार हा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपमध्ये महापालिका निवडणुकीवरून एकमत नसल्याचं दिसून येत आहे. या दोन्ही पक्षातील सर्वोच्च नेत्यांनीच म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनीच परस्पर विरोधी विधाने केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी महापालिका निवडणुका कधी होणार हे स्पष्ट केलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कानावर हात ठेवत ते परमेश्वरालाच माहीत असल्याचं सांगितलं.

दिवाळी निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारल्या. शिंदे यांच्या प्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिवाळी निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी ऑफ दी रेकॉर्ड चर्चा केल्या. यावेळी दोन्ही नेत्यांना महापालिका निवडणुका कधी होणार? हा कॉमन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी येत्या जानेवारीत महापालिका निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे जानेवारीत महापालिका निवडणुकीचं बिगूल फुंकलं जाणार असल्याच्या ब्रेकिंग बातम्याही झाल्या.

पण देवेंद्र फडणवीस यांनी वेगळाच सूर लावल्याने महापालिका निवडणुका कधी होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुका कधी होणार हे न्याय व्यवस्था आणि परमेश्वरालाच माहीत असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, महापालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होतील असं सांगितलं जात होतं. मुख्यमंत्र्यांनीही जानेवारीत निवडणुका होणार असल्याचं सांगितल्याने फेब्रुवारीपर्यंत राज्यातील 14 महापालिकांचं चित्रं स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात होतं.

पण फडणवीस यांच्या या विधानामुळे नवा ट्विस्ट आला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतरच आता महापालिका निवडणुकांचं चित्रं स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...