राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम, कोणकोणत्या घडामोडींकडे आज लक्ष?

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम (Maharashtra Government Crisis) आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र आयोजित केले आहे.

राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम, कोणकोणत्या घडामोडींकडे आज लक्ष?

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम (Maharashtra Government Crisis) आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या बैठकांचे सत्र आयोजित केले आहे. यानुसार आज सकाळी 10 च्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीसाठी द रिट्रीटमध्ये जाणार (Maharashtra Government Crisis) आहेत. या हॉटेलमध्ये शिवसेनेची आमदारांशी चर्चा करणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेते एकनाथ शिंदे, रामदास कदम यांसह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार (Maharashtra Government Crisis) आहेत.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस गोटातही हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी नेत्यांची सर्व आमदारांसोबत सकाळी 11 वाजता भेट होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहे.

त्याशिवाय काँग्रेसचे नेतेही जयपूरमधील आमदारांसोबत बैठक करणार आहेत. सकाळी 9.30 वाजता जयपूरमध्ये ही बैठक होणार आहे. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. मात्र मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. शरद पवारांनी सांगितल्यामुळे ही बैठक रद्द केल्याची माहिती काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी (Maharashtra Government Crisis) दिली.

सत्तास्थापनेच्या वाढत्या हालाचाली बघता भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाही दुपारी 2 वाजता ही बैठक होणार (Maharashtra Government Crisis) आहेत. सध्या मात्र भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.

सत्तासंघर्षाचा पेच कायम

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 20 वा दिवस उलटला तरी सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम आहे. या सत्तासंघर्षात काल (11 नोव्हेंबर) 19 व्या दिवशी नाट्यमय घडामोडी झाल्याचे पाहायला मिळालं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहाय्याने शिवसेना महासेनाआघाडी सरकार स्थापन करणार असं वाटत असतानाच शिवसेनेचा भ्रमनिराश झाला. शिवसेनेनं सत्ता स्थापनेचा दावा केला खरा, पण दोन्ही काँग्रेसचं पाठींब्याचं पत्रच न मिळाल्यानं शिवसेनेची दोन्ही काँग्रेसनं गोची केल्याचं पाहायला मिळालं.

काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यास राजी झाल्याचं सांगण्यात आलं. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याची पत्रं देण्यात आल्याचीही माहिती पुढे आली. त्यामुळे महाराष्ट्रात आता महासेनाआघाडीचं सरकार येणं जवळपास निश्चित मानलं जात होतं. इतकंच काय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी अटकळ बांधली गेली. परंतु काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे या चर्चेतील हवा निघाली.

शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र राज्यपालांनी मुदतवाढ दिलेली नाही.

संबंधित बातम्या : 

दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची मुंबईत पवारांसोबतची बैठक रद्द

खातेवाटप आणि भागीदारीमुळे काँग्रेसचं शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र नाही?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI