Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : चंद्रपुरात एकट्या काँग्रेसचा 65 टक्के ग्रामपंचायतींवर विजय; वडेट्टीवारांचा दावा

चंद्रपूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसने 65 टक्के, तर महाविकास आघाडीने मिळून 75 टक्के ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे, असा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : चंद्रपुरात एकट्या काँग्रेसचा 65 टक्के ग्रामपंचायतींवर विजय; वडेट्टीवारांचा दावा
विजय वडेट्टीवार


Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 | चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसने 65 टक्के, तर महाविकास आघाडीने मिळून 75 टक्के ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे, असा दावा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल धिम्या गतीने येत आहेत. पूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यापूर्वीच वडेट्टीवार यांनी आघाडीला 75 टक्के यश मिळाल्याचा दावा केला आहे. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, आतापर्यंत आलेले निकाल हे जनतेने महाविकास आघाडीच्या कारभाराला दिलेली पसंती आहे. ((Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Latest News and Updates | Congress won 65 seats in Chandrapur says Vijay Wadettiwar)

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर आतापर्यंत 25 टक्के निकाल समोर आले आहेत. आतापर्यंतच्या निकालांमध्ये शिवसेना सर्वात पुढे आहे. शिवसेना 963 जागांवर आघाडींवर आहे, तर भाजपला 820 जागांवर आघडी मिळाली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अनुक्रमे 844 आणि 648 जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील 65 टक्के जागांवर काँग्रेसचा विजय झाल्याचा दावा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

कोरपना तालुक्यात शेतकरी संघटनेला 7 तर काँग्रेसला 7 जागा, भाजपचा 3 जागांवर विजय

दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. कोरपना तालुक्यातील कोडशी ग्रापंचायतीमध्ये शेतकरी संघटनेचा उमेदवारी विजयी झाला आहे. तसेच पिपरी, सांगोडा, वनोजा, शेरज खुर्द, आवारपूर आणि भारोसा या ग्रामपंचायतींमध्येदेखील शेतकरी संघटनेचा उमेदवार विजयी झाला आहे. शेतरी संघटनेप्रमाणे कोरपना तालुक्यात काँग्रेसचेही सात उमेदवारी विजयी झाले आहेत. कोरपनामधील गाडेगाव, हिरापूर, शेरज बु., तळोधी, नांदगाव, भोयगाव आणि कढोली ग्रामपंचायतींवर काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. कोरपन्यात भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. नोकारी, लोणी आणि नारंडा या तीन ग्रामपंचायती भाजपने काबिज केल्या आहेत. तर कोरपन्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकही जागा मिळवता आलेली नाही.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना मोठा धक्का

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होतं. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी खानापूरमध्ये विजय खेचून आणला आहे.


हे ही वाचा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; चंद्रकांतदादांची पहिली प्रतिक्रिया

Gram Panchayat Election Results 2021 : पाटोद्यात आदर्श सरपंच पेरे पाटील हरले, हिवरे बाजारात पोपटराव पवार जिंकले, अण्णांच्या राळेगणसिद्धीत कुणाची सत्ता?

((Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Latest News and Updates | Congress won 65 seats in Chandrapur says Vijay Wadettiwar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI