AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहमंत्री झाल्यावर शुगर-बीपी त्रास हमखास सुरु होतो, RR आबांनी मला त्याचवेळी सांगितलं होतं, जयंत पाटलांची फटकेबाजी

गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरू होतो, हे मला अगोदरच आर आर आबांनी सांगितलं होतं आणि झालंही तसंच गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

गृहमंत्री झाल्यावर शुगर-बीपी त्रास हमखास सुरु होतो, RR आबांनी मला त्याचवेळी सांगितलं होतं, जयंत पाटलांची फटकेबाजी
जयंत पाटील
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 10:09 AM
Share

सांगली : गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरु होतो, हे मला अगोदरच आर आर आबांनी सांगितलं होतं आणि झालंही तसंच गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. सांगलीतील पोलिस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केलेल्या भाषणात सध्याच्या राजकीय संदर्भाने त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

सांगली पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालय याठिकाणी नूतन पोलीस अधीक्षक इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा जलसंपदा तथा सांगली जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सुमनताई पाटील,आमदार सुधीर गाडगीळ,आमदार विक्रम सावंत,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.

पोलिसांना अधिक अधिकार दिले पाहिजे

याप्रसंगी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, “पोलिसांना अधिकार वाढवून देणे गरजेचे आहे.आज कुठे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत जरी गोळीबार केला तर पोलिसांची चौकशी होते, गोंधळ घालणारे लांबच रहातात, त्यामुळे हवेत गोळीबार करणाऱ्यांची आम्ही चौकशी करतो, त्यामुळे आपण पोलिसांना संरक्षण देऊ, तेवढे अधिक धाडसाने पोलीस रस्त्यावर उतरतील.”

राजकारणात पोलिसांचा हकनाक बळी

अनेक वेळा राज्यकर्त्यांमध्ये समज -गैरसमज होतात. त्यावेळी राज्यकर्ते तातडीने पहिल्यांदा पोलिसाला बदला अशी भूमिका घेतात, पण बदल हा उपाय नसतो, खरंच जर त्याची चूक असेल त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे.

आबांना विचारलं गृहखातं कसं असतं, त्यांना मला सल्ला दिला, अन् झालंही तसंच…!

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी गृहमंत्री झाल्यावर माझे ब्लड प्रेशर वाढल्याचे सांगितले. खरंतर 2009 मध्ये आर आर आबा पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने आपल्यावर गृहखात्याची जबाबदारी दिली होती. पण गृहखाते घेण्याआधी एका लग्नाकार्यात आर आर आणि मी दोघे गेलो होतो. त्यावेळी आपण आबांना विचारले, गृहखाते कसं असतं? त्यावेळी आबांना मला विचारले की ? तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा शुगर आहे का? मी आबांना सांगितलं, मला अजिबात त्रास नाही. त्यावर आबा म्हणाले गृहखाते घ्या, तुम्हाला दोन्ही गोष्टी सुरू होतील.आणि गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला,आपल्या खासगी सचिवालाही ब्लड प्रेशर सुरू झाले, इतके तणावपूर्ण काम असते, त्यामुळे तेव्हापासून माझं मत आहे, की आता ब्लड प्रेशर सुरू झाले आहे, शुगर मागे लावून घ्यायचा नाही,अ शी आपली भूमिका आहे.

पोलिसांवरील ताण हलका करण्याची गरज

पण मंत्र्यांवर एवढा ताण असेल तर पोलिस किती तणावाखाली जगत असतील, याचा विचार केला पाहिजे. त्याच बरोबर पोलिसांच्या सुदृढतेकडे लक्ष देण्याबरोबर त्यांना थोडा थोडा आराम देण्यासह, त्यांच्यावरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे मतही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

(Maharashtra Minister jayant patil Comment on home Ministry Gave the Example OF RR patil)

हे ही वाचा :

हिवाळी अधिवेशन : 2 डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य, आमदारांच्या PA ला प्रवेश नाही, प्रेक्षकांना नो एन्ट्री!

तिकीट कापायचा पॅटर्न ठरला; फडणवीस गडकरींच्या बैठकीनंतर भाजप नगरसेवकांची झोप उडाली!

दिलासादायक बातमी : नागपुरात शाळा सुरु होऊन 15 दिवस, पण एकाही विद्यार्थी-शिक्षकाला कोरोनाची बाधा नाही!

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.