दिलासादायक बातमी : नागपुरात शाळा सुरु होऊन 15 दिवस, पण एकाही विद्यार्थी-शिक्षकाला कोरोनाची बाधा नाही!

जिल्हयात प्राथमिक शाळा सुरु होणापूर्वी एक दिलासादायक बातमी आहे. नागपुरातील शाळा सुरु होऊन 15 दिवस उलटून गेलेत पण अजूनपर्यंत एकाही विद्यार्थी-शिक्षकाला कोरोनाची बाधा झालेली नाही. विद्यार्थी-पालक-शिक्षकांच्या दृष्टीने ही खूपच दिलासादायक आणि सकारात्मक वृत्त आहे.

दिलासादायक बातमी :  नागपुरात शाळा सुरु होऊन 15 दिवस, पण एकाही विद्यार्थी-शिक्षकाला कोरोनाची बाधा नाही!
महापालिका शाळा सुरु करण्यास अनुकूल, मात्र लसीकरणाशिवाय पहिली ते पाचवीची शाळा नको

नागपूर : जिल्हयात प्राथमिक शाळा सुरु होणापूर्वी एक दिलासादायक बातमी आहे. नागपुरातील शाळा सुरु होऊन 15 दिवस उलटून गेलेत पण अजूनपर्यंत एकाही विद्यार्थी-शिक्षकाला कोरोनाची बाधा झालेली नाही. विद्यार्थी-पालक-शिक्षकांच्या दृष्टीने ही खूपच दिलासादायक आणि सकारात्मक वृत्त आहे.

15 दिवसांत एकही विदयार्थी शिक्षकाला कोरोनाची बाधा नाही!

शाळेत विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचा धोका कमी झालाय. शाळा सुरु होऊन 15 दिवस झालेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेत रोज पावणेदोन लाखच्या आसपास विद्यार्थी रोज शाळेत जातात, पण गेल्या 15 दिवसांत एकही विद्यार्थी किंवा शिक्षक कोरोना पॅाझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे प्रार्थमिक शाळा सुरु होणापूर्वी पालकांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

पावणे दोन लाख विद्यार्थी शाळेत जातात

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या 1672 शाळा सुरु झाल्याय, तर शहरी भागात आठवी वी ते बारावीच्या ८४४ शाळा सुरु झाल्याय. चार ॲाक्टोबरपासून या शाळा सुरु झाल्याय, रोज सरासरी पावणेदोन लाख विद्यार्थी शाळेत जातात, पण गेल्या १५ दिवसांत एकही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली नाही, ही माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना दिलीय. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळालाय.

गडकरी मास्तरांचा क्लास, विद्यार्थी शिक्षकांना सूचना

दुसरीकडे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात नागपूर महापालिका शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षकांनी देशाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करुन द्यावी. त्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इतिहासावर आधारित चित्रपट दाखवावे. तसेच इतर माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाच्या इतिहासाबद्दल ज्ञान वाढवावं, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केल्या.

नितीन गडकरी नागपुरात महानगरपालिकेने आयोजित केलेल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाच्या लोकार्पण समारंभात बोलत होते. विशेष म्हणजे हे वर्ष “विश्वविजयी तिरंगा प्यारा” या झेंडा गीताचे रचयिता श्यामलाल गुप्त यांची 125 व्या जयंतीचे ही वर्ष आहे. त्यानिमित्ताने महानगरपालिकेने आज नागपूर शहरात अनेक ठिकाणी सामूहिक झेंडा गीताचे गायन ही आयोजित केले होते.

(15 days after school starts in Nagpur, but not Single Case Corona positive)

हे ही वाचा :

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, गडकरी म्हणतात, ‘विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लावा, शाळेत चित्रपट दाखवा’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI