तुम्ही काय शिवसैनिक? नारायण राणेने शिवसेना सोडली, ती शिवसेना गेली, राणेंचा हल्लाबोल

गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे, काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला? कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा, कोण शिवसेना? बडगुजर कोण मी ओळखत नाही, असं नारायण राणे म्हणाले.

तुम्ही काय शिवसैनिक? नारायण राणेने शिवसेना सोडली, ती शिवसेना गेली, राणेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray , Narayan Rane

सिंधुदुर्ग : मी नाही जुमानत त्यांना, ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ. आज ऑफिस तोडलं, उद्या आमच्या घरापर्यंत पोहोचले तर काय करणार, तुम्ही काय शिवसैनिक, ते शिवसैनिक गेले, नारायण राणेने शिवसेना सोडली, ती शिवसेना गेली, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे. त्यानंतर चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेत राणेंनी उत्तर दिलं.

मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे, काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला? कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा, कोण शिवसेना? बडगुजर कोण मी ओळखत नाही, असं राणे म्हणाले.

नारायण राणे काय म्हणाले?

मी बातमीवर विश्वास ठेवणार नाही. मला माहिती मिळाल्यावर आम्ही समर्थ आहोत. दगड मारुन जाणं हा पुरुषार्थ नाही. आम्ही पाहू, काय पुरुषार्थ आहे. ज्यावेळेला शिवसेना भवन फोडू असं लाड म्हणाल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले थोबाड फोडू, हा क्राईम नाही का? त्यावेळी का गुन्हा नाही? असा सवाल नारायण राणेंनी विचारला.

15 ऑगस्ट हा वर्धापन दिन हा माहिती नाही मुख्यमंत्री असताना, मी म्हणालो त्याने मागे सेक्रेटरीला विचारावं. आणि त्यावेळी मी असतो तर.. असतो तर हा क्राईम नाही. मी आता कानफाड फोडीन हा क्राईम आहे. मी पण कॅबिनेट मंत्री आहे देशाचा. देशाचा अमृत महोत्सव माहिती नाही हा राष्ट्रद्रोह आहे, असा घणाघात नारायण राणेंनी केला.

“पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान?”

आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही. कोण शिवसेना, समोर उभं तरी राहावं.. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे यात्रा होणार, असंही राणेंनी स्पष्ट केलं.

“नारायण राणेने शिवसेना सोडली, तेव्हाच…”

आम्ही भीक घालत नाही असल्या शिवसैनिकांना. कोण आहेत समोर उभं तरी राहावं, मी नाही जुमानत त्यांना, ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ. आज ऑफिस तोडलं, उद्या आमच्या घरापर्यंत पोहोचले तर, नारायण राणेने शिवसेना सोडली, तेव्हाच शिवसेना गेली, असंही नारायण राणे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

संबंधित बातम्या :

मी नॉर्मल माणूस वाटलो काय? आमचं पण वरती सरकार, बघतोच : नारायण राणे

 नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचं कार्यलय फोडलं, सांगलीत राणेंच्या पोस्टरवर शाईफेक

नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, भाजपने ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI