Shiv sena : डॅमेज कंट्रोलसाठी आदित्य ठाकरे मैदानात! मुंबईत आज पुन्हा शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन, दहिसरमध्ये युवामेळावा

Aditya Thackeray : दहिसरमध्ये शिवसेनेच्या युवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.

Shiv sena : डॅमेज कंट्रोलसाठी आदित्य ठाकरे मैदानात! मुंबईत आज पुन्हा शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन, दहिसरमध्ये युवामेळावा
आदित्य ठाकरे
Image Credit source: TV9 Marathi
विनायक डावरुंग

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 26, 2022 | 9:16 AM

मुंबई : महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून (Maharashtra Political Crisis) निघालंय. शिवसेना पक्षावर संकटाचे ढग दाटलेत. अशावेळी डॅमेज कंट्रोलसाठी आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) मैदानात उतरले आहेत. शिवसेनेकडून आता शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. शनिवारी राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीनंतर युवा मेळावाही घेण्यात आला होता. दादरमध्ये संध्याकाळी शिवसेनेचा युवामेळावा पार पडला होता. त्यानंतर आता दहिसरमध्ये (Dahisar Shiv sena News) शिवसेनेच्या युवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्याआधी इथे मुंबईत बाईक रॅलीदेखील काढली जाणार आहे. इकडे मुंबईत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. दैनिक सामनाचं कार्यालय ते शिवसेना भवन अशी बाईक रॅली काढत शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.

शिवसेनेत अस्वस्थता

एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यापासून शिवसेनेत मोठी अस्वस्थता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सक्रिय झालेत. आज शिवसेनेकडून दहिसरमध्ये युवा सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी मोडी मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. ती दूर करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना यापुढे कशा पद्धतीने काम करेल हे स्पष्ट करणार आहेत.

शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन :

  1. युवा सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक
  2. शिवसेना भवनात बैठक होणार, बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता
  3. सकाळी 10.30 वाजता शिवसैनिक सामना कार्यालय ते शिवसेना भवनापर्यंत बाईक रॅली काढणार
  4. संजय राऊतांच्या उपस्थितीत शिवसेनेचा आज 11 वाजता दहिसरमध्ये मेळावा

बरं झालं घाण गेली- आदित्या

बरं झाली घाण गेली, असं म्हणत यापुढे सगळं चांगलं घडणार, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. शनिवारी झालेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचं वाईट वाटतं, असंही ते म्हणालेत. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

हे सुद्धा वाचा

वाचा एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें