केंद्राकडे बोट दाखवून ठाकरे सरकार स्वतःचं अपयश लपवू शकत नाही; रामदास आठवलेंचा टोला

राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

केंद्राकडे बोट दाखवून ठाकरे सरकार स्वतःचं अपयश लपवू शकत नाही; रामदास आठवलेंचा टोला
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 6:08 PM

मुंबई : रेमडेसिव्हीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला आहे. कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहनही रामदास आठवले यांनी आज मुंबईत केले. (Mahavikas Aghadi government cannot hide its failures by pointing finger at central Govt says Ramdas Athavale)

कोरोना या साधीच्या रोगामुळे मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत, त्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा खोटा खोडसाळ आरोप राज्य सरकार करीत आहे. देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी; राज्यपालांशी संवाद साधत आहेत. महराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लस, ऑक्सिजन; रेमडेसिव्हीरसह सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोटे खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

आठवले म्हणाले की, मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.

आधी कोरोना संकटाकडे लक्ष द्या, चंद्रकांत पाटलांचा सल्ला

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे. त्यामुळे सातत्याने केंद्र सरकारवर बालिश आरोप करणं बंद करावे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना दिला

आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे. त्यात वाद निर्माण करुन कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडीकडून चालू आहे. सामान्य जनता चहुबाजूंनी संकटात असताना महाविकास आघाडीकडून आरोपांचे राजकारण चालू आहे. पण, राज्य सरकारने आता तरी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती एकवटली नाही तर सामान्य लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

नवाब मलिकांचे आरोप बालिश आणि हास्यास्पद

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी रेमडिसिवर औषधाबाबत काल केलेला आरोप बालिश आणि हास्यास्पद आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर विकण्यास सोळा कंपन्यांना मनाई केली, असा धादांत असत्य आरोप त्यांनी केला. त्यासाठीचे पुरावे मागितले तर त्यांनी ते दिलेले नाहीत. केंद्रावर आरोप केला असताना त्यांनी गुजरात सरकारचा आदेश दाखविला. एखाद्या कंपनीने रेमडेसिव्हीर विकण्यासाठी गुजरात सरकारला परवानगी मागितली तर ते सरकार केवळ त्यांच्या राज्यापुरताच आदेश देऊ शकते, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

इतर बातम्या

मविआच्या ‘या’ आमदाराकडेही रेमडेसिवीरचा साठा, पण वाटप करत नाही, मनसेचा गंभीर आरोप

मीदेखील विरोधी पक्षनेता होतो, पण संकटाच्या काळात कधीही असला खेळ खेळला नाही; खडसेंनी फडणवीसांना फटकारले

‘पीयूष गोयल महाराष्ट्राचा अपमान करतायत, राज्यात तुम्हाला 5 लोकं तरी ओळखत असतील का?’

(Mahavikas Aghadi government cannot hide its failures by pointing finger at central Govt says Ramdas Athavale)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.