MLC Election | भाजपची 2 मतं महाविकास आघाडीलाच मिळणार, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अमोल मिटकरी यांचा दावा

थोडा काही नाराजीचा सूर असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचे पालकत्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला चारीमुंड्या चीत करण्याकरिता महाविकास आघाडी सज्ज आहे. नाराजी दूर होईल, असं अमोल मिटकरी म्हणालेत.

MLC Election | भाजपची 2 मतं महाविकास आघाडीलाच मिळणार, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अमोल मिटकरी यांचा दावा
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 6:14 PM

अकोला : भाजपची 2 मतं महाविकास आघाडीलाच मिळणार असा गौप्यस्फोट विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अमोल मिटकरी यांनी केला. भारतीय जनता पार्टीला चारीमुंड्या चीत करण्याकरिता महाविकास आघाडी सज्ज झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले, तिन्ही पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख पक्षश्रेष्ठी निकाल वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सर्व आपल्या आमदारांची बैठक घेतली. राज्यसभेमध्ये (Rajya Sabha) जी चूक झाली ती चूक आता विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad) होऊ नये, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्यामुळे वैयक्तिक पक्षाच्या ज्या ज्या वेळी पक्षप्रमुखांनी मीटिंग (Meeting) घेतली असेल त्यावेळी त्या पक्षाच्या आमदारांनी मनातली खदखद बोलून दाखवली असेल.

भाजपला चारी मुंड्या चित करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज

मात्र, शिवसेनेचा आज पक्ष स्थापना दिवस पण आहे. पण त्यामुळे हा महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. थोडा काही नाराजीचा सूर असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचे पालकत्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला चारीमुंड्या चीत करण्याकरिता महाविकास आघाडी सज्ज आहे. नाराजी दूर होईल, असं अमोल मिटकरी म्हणालेत. पण, नाराज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळं किती जणांची नाराजी दूर होणार हे विधान परिषदेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

सर्व आमदारांची समजूत निघेल

थोडेफार काही तक्रारी असतील तर तसं नाही होणार. सर्व आमदारांची समजूत काढली जाईल. मात्र,हा प्रश्न महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेचा असल्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार आहेत. गुप्त मतदानातून हे दिसून येईल. उलट भाजपची दोन मत महाविकास आघाडीला पडणार आहे. त्याच्यामुळे उद्या चार वाजेपर्यंत आपण सर्वांनी वाट पाहावी. असं अमोल मिटकरी यांचा दावा असला, तर नक्की काय होणार हे उद्याच स्पष्ट होईल. भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांच्या वतीनं विजयाचे दावे केले जात आहेत. कुणाचा गौप्यस्फोट खरा ठरतो, हे निकालावर अवलंबून आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.