माळेगाव निवडणूक निकाल LIVE : 21 पैकी 7 जागांचे निकाल जाहीर, 6 जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी आपली ताकद पणाला लावली.

Malegaon Sugar Factory Election Result, माळेगाव निवडणूक निकाल LIVE : 21 पैकी 7 जागांचे निकाल जाहीर, 6 जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

बारामती : बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील 21 जागांपैकी 7 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलनं बाजी मारली आहे. पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने रंजन तावरे यांच्या ‘सहकार बचाव पॅनल’चा धुव्वा उडवल्याचं दिसत आहे. या निकालासह अजित पवार यांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा राखली आहे. ‘सहकार बचाव पॅनल’च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप (Malegaon Sugar Factory Election Result) घेतल्यामुळे काही काळ मतमोजणी थांबली. त्यामुळे अद्यापही मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी रविवार (23 फेब्रुवारी) मतदान झालं होतं, तर मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. तब्बल 92 टक्के मतदान झाल्याने निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव पॅनलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.

LIVE Updates : माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक

Malegaon Sugar Factory Election Result, माळेगाव निवडणूक निकाल LIVE : 21 पैकी 7 जागांचे निकाल जाहीर, 6 जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

माळेगाव कारखान्याच्या 7 जागांचे निकाल जाहीर, 7 जागांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादी

बारामती सहकारी साखर कारखान्याच्या 21 पैकी 7 जागांचे निकाल जाहीर, 7 जागांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादीच्या निळकंठेश्वर पॅनल विजयी, एका जागेवर विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे विजयी, ‘ब’ वर्ग गटात स्वप्निल जगताप, तर मालेगाव गटात निळकंठेश्वर पॅनलचे 2 आणि सहकारी पॅनलचा 1 उमेदवार विजयी, पणदरे गटात निळकंठेश्वर पॅनलचे 3 उमेदवार विजयी

24/02/2020,11:51PM
Malegaon Sugar Factory Election Result, माळेगाव निवडणूक निकाल LIVE : 21 पैकी 7 जागांचे निकाल जाहीर, 6 जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

माळेगाव गट नंबर 1 - सातवी फेरी

संजय काटे (राष्ट्रवादी) – 4192, बाळासाहेब भाऊ तावरे (राष्ट्रवादी) – 4502, पोपटराव बुरुंगले (राष्ट्रवादी) – 3965, रंजन काका तावरे (सहकार बचाव) – 4712, संग्राम काटे – (सहकार बचाव) – 4176, स्वरुप वाघमोडे – (सहकार बचाव) – 3917

24/02/2020,10:28PM

माळेगाव कारखाना मतमोजणीवेळी दोन मतं बाद ठरवल्याने सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. मतमोजणी कक्षातच हा वाद झाला.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा निळकंठेश्वर पॅनल निवडणूक रिंगणात आहे. त्याच्याविरोधात विद्यमान सत्ताधारी चंदरराव तावरे यांच्या समर्थकांचा ‘सहकार बचाव पॅनल’ आहे. साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरील 21 जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण 56 उमेदवार आहेत. यामध्ये 14 अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे.

‘सहकार बचाव पॅनल’च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतला. मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही पाहूनच मोजणी सुरु करण्याची मागणी तावरेंनी केली. 45 टेबलवर मतमोजणी होत असून प्रत्येक टेबलवर एक मतपेटी उघडली जात आहे. उमेदवाराच्या प्रतिनिधींसमोर मतपेटी उघडून मतपत्रिका वेगवेगळ्या करुन मतमोजणी होत आहे.

निकाल ऐकण्यासाठी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्रावर गर्दी केली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Malegaon Sugar Factory Election Result)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *