छगन भुजबळांना मोठा धक्का, खंद्या समर्थकाचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) ऐन तोंडावर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना (Shivsena challenge Chhagan Bhujbal) मोठा धक्का बसला आहे.

छगन भुजबळांना मोठा धक्का, खंद्या समर्थकाचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) ऐन तोंडावर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना (Shivsena challenge Chhagan Bhujbal) मोठा धक्का बसला आहे. भुजबळ यांचे खंदे समर्थक माणिकराव शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा (Nashik Politics) दिला आहे. माणिकराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली.

विशेष म्हणजे शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, माजी आमदार कल्याणराव पाटील हेही उपस्थित होते. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भुजबळांविरोधात दंड थोपटले आहेत. ते स्वतः भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये 3 जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे भुजबळांना मोठं आव्हान असणार आहे.

दरम्यान, भुजबळ यांनी मागील काही काळात येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यांनी या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं लोकार्पण केलं. त्यामुळे येथे भुजबळच प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र, बदलत्या राजकीय गणितांनी भुजबळ यांची अडचण होण्याची शक्यता आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI