स्पष्टवक्तेपणामुळे राजकारणात अनेकदा नुकसानही होतं, पण गडकरी पर्वा करत नाहीत, मनोहर जोशी भारावले

नितीन गडकरी  (Nitin Gadkari) यांनी घेतलेल्या भेटीनंतर मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी टीव्ही 9 मराठीकडे एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली

स्पष्टवक्तेपणामुळे राजकारणात अनेकदा नुकसानही होतं, पण गडकरी पर्वा करत नाहीत, मनोहर जोशी भारावले
नितीन गडकरींनी मनोहर जोशींची भेट घेतली

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  (Nitin Gadkari) यांनी घेतलेल्या भेटीनंतर शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी टीव्ही 9 मराठीकडे एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. “नितीन गडकरी घरी आल्याचा आनंद झाला. गडकरींनी स्वतःहून भेटीसाठी येत असल्याचं सांगितलं. त्यांच्याबाबत मला संपूर्ण माहिती आहे. ते स्पष्टवक्ते आहेत”, असं मनोहर जोशी म्हणाले. (Manohar Joshi overwhelmed by Nitin Gadkari’s visit)

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच, गुरुवारी 7 जानेवारीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची मुंबईत भेट घेत ऋणानुबंध कायम असल्याचं दाखवलं. या भेटीने मनोहर जोशी भारावले. या भेटीबाबत जोशी सर भरभरुन बोलले.

नितीन गडकरींनी दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल काय सांगाल? असा प्रश्न मनोहर जोशी यांना विचारण्यात आला.

त्यावर मनोहर जोशी म्हणाले, “गडकरींनी स्वतःहून सांगितलं मी भेटण्यासाठी येतोय. मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. मी घरी गेलो. नितीन गडकरींची मला माहिती पूर्ण आहे. त्यांनी माझ्या नातवाशी चर्चा केली. गडकरी घरी आल्याचा आनंद झाला. त्यांचे मुख्य वैशिष्टय आहे स्पष्टवक्तेपणा. यामुळे राजकारणात अनेकदा नुकसानही होते. पण त्याची पर्वा न करता गडकरी त्यांच्या मनात जे आहे ते बोलतात. ते बराच वेळ माझ्या घरी बसले होते. आमच्या चांगल्या गप्पा झाल्या. मग ते गेले. ती राजकीय भेट नव्हती. सामाजिक भेट म्हणाल तर जरूर होती”.

नितीन गडकरींनी बांधलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून गेल्यानंतर आज सर्वजणच धन्यवाद देतात, असंही मनोहर जोशींनी सांगितलं.

बरेच दिवस आम्ही भेटलो नव्हतो. त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही भेटलो. आताच्या मंत्रिमंडळातील माझे सर्वात आवडते मंत्री आहेत, असं जोशी म्हणाले.

माझ्या मुलाची नितीन गडकरींशी चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये जास्त गप्पा झाल्या. फार गंभीर चर्चा झाली नाही. पण काही प्रश्न बोलण्याच्या ओघात येतात. माझ्या नातवाशी गडकरींनी गप्पा मारल्या. थोडी चर्चा झाली पण चांगली चर्चा झाली, असं त्यांनी नमूद केलं.

Manohar Joshi Nitin Gadkari 2

मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात गडकरींचं कौतुकास्पद काम

मनोहर जोशी हे 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. जोशींच्या कार्यकाळात शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा होती. पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून मुंबई-पुणे महामार्गाच्या विकासात नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो.

नितीन गडकरी- मनोहर जोशी भेट

नितीन गडकरी यांनी गुरुवारी 7 जानेवारीला मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची मुंबईत भेट घेतली. मनोहर जोशी यांचं वय सध्या 83 वर्षे आहे. गडकरी यांनी मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचं सांगण्यात येतं.

संबंधित बातम्या 

नितीन गडकरी ‘सरां’च्या भेटीला, मनोहर जोशींना वाकून नमस्कार 

(Manohar Joshi overwhelmed by Nitin Gadkari’s visit)

Published On - 2:35 pm, Fri, 8 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI