AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेनेला पाठिंबा

मुंबई: मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र क्रांती सेनेने उभे केलेले 15 उमेदवारही मागे घेतले आहेत. महाराष्ट्र क्रांती सेनेचे प्रमुख सुरेश पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. हा पक्ष आता महायुतीचा घटक पक्ष असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेला […]

मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेनेला पाठिंबा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

मुंबई: मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र क्रांती सेनेने उभे केलेले 15 उमेदवारही मागे घेतले आहेत. महाराष्ट्र क्रांती सेनेचे प्रमुख सुरेश पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. हा पक्ष आता महायुतीचा घटक पक्ष असेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेला घटक पक्ष म्हणून मान्यता दिली. शिवाय मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याची हमी दिल्याचा दावा महाराष्ट्र क्रांती सेनेने केला. यावेळी महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील, भाजप नेते विनोद तावडे आणि शिवसेना नेते दिवाकर रावते उपस्थित होते.

गेल्या वर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरेश पाटील यांनी अनेक मराठा संघटनांचा विरोध डावलून, महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना केली होती. रायरेश्वर गडावर या पक्षाची घोषणा करण्यात आली होती.  या पक्षाकडून विद्यमान सरकारविरोधात लोकसभा निवडणुकीत 15 उमेदवारही जाहीर करण्यात आले होते. मात्र आता ते सर्व उमेदवार मागे घेण्यात आले आहेत.

मुंबईत रविवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीत महाराष्ट्र क्रांती सेनेने भाजप-शिवसेना युतीसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. “आम्हाला आमच्या आरक्षणासाठी मदत करणाऱ्या सरकारला पाठिंबा दिला आहे. गरज पडल्यास समाजासोबत सरकारच्याविरोधात जाण्यासही तयार असेल”, असं सुरेश पाटील यांनी सांगितलं.

यावेळी विनोद तावडे म्हणाले, “आज महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीत सहभागी झाली. महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी काहीतरी ठोस करण्यासाठी आम्हाला शक्ती  मिळाली आहे. मराठा समाजाला मिळवून दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या कसोटीतील आहे. त्यामुळे यापुढेही ते टिकेल. आमचा शब्द फिरणार नाही. जो शब्द दिलाय तो कायम राहील”.

दरम्यान,  मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र क्रांती समाजाला  ग्वाही देणारं एक पत्र दिलं. ते विनोद तावडे आणि दिवाकर रावते यांनी वाचून दाखवलं. मराठा समाजाला कायम पाठिंबा असेल, असं या पत्रात नमूद करण्यात आलं.

संबंधित बातम्या

मराठ्यांची क्रांती सेना 47 जागा लढवणार, फक्त ‘ही’ जागा सोडली!  

मराठा मोर्चाचा पक्ष स्थापन, नाव ठेवलं…!    

मराठा आरक्षणावरील विनोद पाटलांची याचिका अखेर निकाली!  

Follow Us
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.