AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मातोश्री’वर आलेला ‘तो’ शेतकरी मदतीसाठी कृषीमंत्र्यांकडे, 8 दिवसात चौकशी करा, कृषीमंत्र्यांचे आदेश

कृषीमंत्री दादा भुसे यांनी 8 दिवसात संपूर्ण चौकशी करा, असे आदेश रायगड जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी यांनी (Matoshree Farmer meet agriculture minister) दिले.

‘मातोश्री’वर आलेला 'तो' शेतकरी मदतीसाठी कृषीमंत्र्यांकडे, 8 दिवसात चौकशी करा, कृषीमंत्र्यांचे आदेश
| Updated on: Jan 06, 2020 | 10:16 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी एका शेतकऱ्याला पोलिसांकडून धक्काबुक्की झाली (Matoshree Farmer meet agriculture minister)  होती. या प्रकरणानंतर आज (6 जानेवारी) शेतकरी महेंद्र देशमुख कृषी मंत्री दादा भुसेंना भेटले. यावेळी याप्रकरणी कृषीमंत्री दादा भुसे यांनी 8 दिवसात संपूर्ण चौकशी करा, असे आदेश रायगड जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी यांनी दिले. याचा अहवाल शासनाकडे सादर करावा असेही निर्देश दिले (Matoshree Farmer meet agriculture minister) आहेत.

पनवेल तालुक्यातील आपटा शाखेच्या बँक ऑफ इंडियाने फसवणूक केल्याचा आरोप करत महेंद्र देशमुख यांनी आंदोलन केलं होतं. या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीमार्फत आठ दिवसांत चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी एका शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही कृषिमंत्री म्हणाले.

मातोश्रीवरील आंदोलनापासून चर्चेत असलेल्या महेंद्र देशमुख यांनी आज (6 जानेवारी) सकाळी 9 वाजता पनवेल तहसीलदार कार्यालयात उपोषणासाठी दाखल झाले. त्यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि तीन मुलीही होत्या. मात्र या चौघांना पोलिसांनी बसून दिले नाही. पनवेल तहसीलदार अमित सानप यांनी कर्ज न घेता शेतकऱ्यावर खोटं कर्ज दाखवलं. तसेच त्याच्या फिक्स डिपॉजीटची रक्कम त्याला परत मिळू नये यासाठी हे षड्यंत्र रचल्याचा आरोप शेतकरी महेंद्र देशमुख यांनी केला आहे. यानंतर कृषिमंत्री दादा भूसे यांनी शेतकरी महेंद्र देशमुख, बँकेच्या अधिकारी व पनवेल तहसीलदारला मंत्रालय बोलावून (Matoshree Farmer meet agriculture minister) घेतले.

नेमकं प्रकरण काय?

यावेळी देशमुख यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. महेंद्र देशमुख यांनी त्यांच्या 3 मुलींच्या शिक्षणासाठी, तसेच स्वखर्चासाठी 23 फेब्रुवारी 2006 रोजी 8 लाख 40 हजार एवढी रक्कम फिक्स डिपॉझिट खात्यात जमा केली. बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेत त्यांची ही रक्कम जमा होती.

त्यांनतर 2008 मध्ये बँकेने देशमुख यांना दूध डेअरी च्या व्यवसायासाठी 40 लाख रुपयांचे आश्वासित केले. त्यावेळी त्या 40 लाखांसाठी देशमुख यांची 40 लाख रुपये किंमतीएवढी मालमत्ता बँकेला तारण म्हणून हवी होती.

यानंतर 15 मार्च 2008 ला देशमुख यांनी 10 लाख 20 हजार रुपये रक्कम कुटुंबातील सर्वांच्या नावे जमा केली. त्यापूर्वी 2006 व 2007 यावर्षाची खात्यातील एकूण जमा रक्कम अंदाजे 23 ते 24 लाखापर्यंत होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचे घर तारण ठेवले. त्या घराची रक्कम बँकेने जवळपास 8 लाख ठरवली. त्यानुसार अंदाजे 32 लाखापर्यंत रक्कम बँकेकडे तारण ठरवण्यात आली.

मात्र तरीही 40 लाख तारण मालमत्ता दाखवण्यासाठी 8 लाख कमी पडत होते. त्यामुळे ते प्रकरण बँकेकडे सर्व कागदोपत्री स्थगित (Matoshree Farmer meet agriculture minister) राहिले.

पण या सर्व प्रकरणात शेतकरी देशमुख यांना तारण ठेवलेले जवळपास 32 लाख परत मिळू नये यासाठी कर्ज काढण्याआधीच एकूण 3 कर्ज बँकेने त्यांच्यावर लेखी पत्र देऊन लादल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान काल (5 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी एका शेतकऱ्याला पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी शेतकरी महेंद्र देशमुख आणि त्यांच्या लहान मुलीला खेरवाडी पोलीस ठाण्यात सहा तास बसवले होते. यानंतर दोघांना कुर्ला रेल्वे पोलिसांकडून पनवेलकडे पाठवले होते.

मातोश्रीवरील आंदोलनापासून चर्चेत असलेल्या महेंद्र देशमुख यांनी या सर्व प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आज सकाळी 9 वाजता त्यांनी पनवेल तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी आले. मात्र त्यावेळी पोलिसांनी तिथे बसू दिले (Matoshree Farmer meet agriculture minister) नाही.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ