AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मावळमध्ये 2014 ला काय झालं होतं?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 तारखेला होणार आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर महाराष्ट्रासह देशभरातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी या टप्प्यात निवडणूक होणार आहे. या जागांपैकी सर्वात उत्सुकतेची लढत म्हणजे मावळ. पवार कुटुंबातील तिसरी पिढी पार्थ पवार यांच्या रुपाने या निवडणुकीत आहे. त्यामुळे पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मावळमध्ये 2014 ला काय झालं होतं?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 तारखेला होणार आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर महाराष्ट्रासह देशभरातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी या टप्प्यात निवडणूक होणार आहे. या जागांपैकी सर्वात उत्सुकतेची लढत म्हणजे मावळ. पवार कुटुंबातील तिसरी पिढी पार्थ पवार यांच्या रुपाने या निवडणुकीत आहे. त्यामुळे पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मावळमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे त्यांच्या मेहनतीला किती यश येतंय हे येत्या 23 मे रोजी कळणार आहे.

मावळ मतदारसंघाची लढत सध्या जेवढी रंगतदार दिसत आहे, तेवढीच रंगतदार 2014 लाही झाली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. तर सध्या भाजपात असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. श्रीरंग बारणे यांनी 5 लाख 12 हजार 226, तर लक्ष्मण जगतापांनी 3 लाख 54 हजार 829 मतं घेतली होती. एवढी मोठी मतं घेणारा उमेदवार यावेळी शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने आहे. लक्ष्मण जगताप हे सध्या भाजपचे आमदार आहेत.

2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राहुल नार्वेकर यांना 1 लाख 82 हजार 293 मते मिळाली होती. आम आदमी पार्टी आणि बसपानेही मोठ्या प्रमाणात मते घेतली. पण यावेळी वंचित बहुजन आघाडीकडूनही मतांचं विभाजन होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून बनलेला अर्धे पुणे जिल्हा आणि अर्धे कोकण जिल्हा असे प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ म्हणून मावळची ओळख आहे. पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या या मतदारसंघाने पहिली निवडणूक पाहिली ती 2009 मध्ये. या निवडणुकीत लढत झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे आणि शिवसेनेच्या गजानन बाबर यांच्यात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत लक्षात घेता आझम पानसरे यांना सरळ विजय मिळेल अशी शक्यता होती. पण या ठिकाणी मुद्यावर निवडणूक न होता जातीच्या आधारावर निवडणूक लढली गेली. त्यामुळे मुस्लीम असलेल्या आझम पानसरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

आझम पानसरे यांना त्यांच्याच पक्षातल्या लोकांची मदतही मिळाली नाही. राष्ट्रवादी संलग्न असलेले अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे सर्वश्रुत असलेले वैर आणि मुळात मुस्लीम विरोधी मराठा असा सामना रंगवण्यात सगळ्यांना यश आल्याने ही निवडणूक वैयक्तिक पातळीवरच लढली गेली. त्यात बाबर यांनी तब्ब्ल 80 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. बाबर यांना 3 लाख 64 हजार 857 मते मिळाली, तर पानसरे यांना 2 लाख 84 हजार 238 मते मिळाली.

2014 मध्येही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगेल अशी चिन्ह होती. पण ऐनवेळी लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षात उडी घेतली आणि राष्ट्रवादीला शेवटच्या क्षणी उमेदवार शोधण्याची धावाधाव करावी लागली. अखेर राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. शिवसेनेकडून पुन्हा गजानन बाबर यांना संधी मिळेल असे वाटत असताना अखेरच्या क्षणी श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली. मोदी लाटेच्या परिणामामुळे बारणे यांनाही अपेक्षित नसलेला विजय मिळाला. बारणे यांनी जगताप यांच्यावर तब्ब्ल 1 लाख 57 हजार 397 मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीची तर पुरती धूळधाण झाली होती.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.