ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये बैठक; कुठलीही राजकीय चर्चा नाही, आदित्य ठाकरेंची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. त्यानंतर ममता बॅनर्जी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलीय.

ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये बैठक; कुठलीही राजकीय चर्चा नाही, आदित्य ठाकरेंची माहिती
आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि ममता बॅनर्जींची भेट

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्या मुंबईत दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचं (SiddhiVinayak Temple) दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. त्यानंतर ममता बॅनर्जी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलीय.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये आल्या आहेत. जेव्हाही मुंबईच्या दौऱ्यावर त्या येतात तेव्हा आम्ही त्यांची भेट घेत असतो. आमच्यात एक वेगळे नाते आहे. आज कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या बैठकीत औपचारिक चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही, असं आदित्य ठाकरे यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.

ममतादीदी म्हणाल्या, ‘जय मराठा, जय बांग्ला’

मुंबईत पोहोचताच त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्या म्हणाल्या की उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. मला इथे येऊन बरे वाटले. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. मी खूप आनंदी आहे असं म्हणत ‘जय मराठा, जय बांग्ला’ नारा ममता बॅनर्जींनी दिला. बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते. मी मंदिर समितीचे, ट्रस्टीचे, पंडित, गुरुजी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो, असंही त्या म्हणाल्या.

ममता यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर, शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट दिली आहे. त्या म्हणाल्या की तुकाराम ओंबळे यांनी जे देशासाठी काम केलं त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मी इथे आले आहे.

उद्या शरद पवारांसोबत बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या प्रकृतीमुळे भेटणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घोणार आहे. शरद पवार यांची देखील मी भेट घेणार आहे, त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. त्या म्हणाल्या, “मला जो संदश द्यायचा आहे, तो मी देईन. मुंबईला येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरी गेले नाही असं शक्य नाही. त्यामुळे मी शरद पवार यांच्या घरी उद्या जाणार आहे”, ममता म्हणाल्या.

इतर बातम्या :

देबाशिष चक्रवर्तींनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला; तर मुख्यमंत्र्यांकडून सीताराम कुंटेंची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती

School Reopening : शाळेची घंटा वाजणार काय?; वाचा, तुमच्या जिल्ह्यात काय होणार!

Published On - 8:37 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI